India’s Tour of Sri Lanka : भारतीय संघाची मुंबई – कोलंबो – पल्लेकल अशी मजल दरमजल 

India’s Tour of Sri Lanka : सोमवारी संध्याकाळी भारतीय संघ पल्लेकलला पोहोचला आहे

99
India’s Tour of Sri Lanka : भारतीय संघाची मुंबई - कोलंबो - पल्लेकल अशी मजल दरमजल 
India’s Tour of Sri Lanka : भारतीय संघाची मुंबई - कोलंबो - पल्लेकल अशी मजल दरमजल 
  • ऋजुता लुकतुके

टी-२० विश्वचषकातील विजेतेपदानंतर भारतीय संघ टी-२० मधील आपली दुसरी मालिका खेळण्यासाठी श्रीलंकेत पोहोचला आहे. मुंबईहून कोलंबो आणि पुन्हा प्रवास करून संघ सोमवारी संध्याकाली पल्लेकलला पोहोचला. तेव्हाचा व्हीडिओ बीसीसीआयने मंगळवारी ट्विटरवर शेअर केला आहे. (India’s Tour of Sri Lanka)

(हेही वाचा- Pooja Khedkar ला खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर अडचणीत; महापालिकेचे चौकशीचे आदेश)

भारतीय संघाचा मुंबई ते पल्लेकल प्रवास, व्हाया कोलंबो असा मथला या व्हीडिओला त्यांनी दिला आहे. २७ जुलैपासून टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. तीनही सामने पल्लिकल इथंच होणार आहेत. नवे प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्या मार्गदर्शनाखाली ही पहिलीच मालिका असेल. (India’s Tour of Sri Lanka)

कोलंबोला उतरून बसने संघ पल्लेकलला पोहोचला. हा प्रवासही निसर्गाच्या सानिध्यातील होता. २७, २८ आणि ३० तारखेला तीन टी-२० सामने पार पडल्यानंतर एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ कोलंबोला रवाना होईल. तिथे प्रेमदासा स्टेडिअमवर २ ऑगस्टपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल. श्रीलंकन क्रिकेट मंडळानेही ट्विट करून भारतीय संघाचं पल्लेकलमध्ये स्वागत केलं आहे.  (India’s Tour of Sri Lanka)

टी-२० क्रिकेटमधून रोहित (Rohit) आणि विराट (Virat) यांनी निवृत्ती घेतल्यानंतरची ही पहिली मालिका आहे. शुभमन गिल (Shubman Gill) तसंच रिंकू सिंग (Rinku Singh) त्यांची जागा कशी भरून काढतात हे या मालिकेत दिसणार आहे. २०२६ च्या भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी संघ तयार करणं हे आता गंभीर यांच्यासमोरचं पुढील आव्हान आहे. तर एकदिवसीय संघही चॅम्पियन्स करंडक डोळ्यासमोर ठेवून तयारी करणार आहे.  (India’s Tour of Sri Lanka)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.