INDvsPAK Football Match : फुटबॉलच्या मैदानात वाद, भारतीय कोचसोबत भिडले पाकिस्तानचे खेळाडू

भारताने पाकिस्तानचा ४-० च्या फरकाने पराभव केला.

271
INDvsPAK Football Match : फुटबॉलच्या मैदानात वाद, भारतीय कोचसोबत भिडले पाकिस्तानचे खेळाडू

दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेला २१ जूनपासून (INDvsPAK Football Match)  सुरुवात झाली आहे. बेंगलोरमधील के श्री कांतीरावा स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फुटबॉल सामना रंगला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला. मात्र सामन्यादरम्यान मैदानावरील वातावरण बिघडले आणि काही काळासाठी सामना थांबवण्यात आला.

भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर भारताने फुटबॉलच्या मैदानात पाकिस्तानला (INDvsPAK Football Match) नमवले. बेंगलोरमध्ये झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ४-० च्या फरकाने पराभव केला. या सामन्यात गरमागरमी झाली.. दोन्ही संघामध्ये चांगलाच वाद झाला होता. यावेळी भारतीय पंचांना पाकिस्तानच्या खेळाडूंनी धक्काबुक्की केली. दोन्ही संघामध्ये मोठा वाद झाला होता. त्यामुळे काही वेळासाठी सामना थांबला होता. सामन्याच्या रेफरीने वाद संपल्यानंतर भारतीय कोचला रेड कार्ड दाखवले.

(हेही वाचा – Hacking Data : ही मोबाईल कंपनी चोरतेय तुमचा डेटा; सावध रहा, सतर्क रहा…)

नेमका प्रकार काय?

संपूर्ण सामन्यात टीम इंडियाचे (INDvsPAK Football Match) वर्चस्व होते. एकादाही पाकिस्तानच्या संघाला पुनरागमन करता आले नाही. सामन्यात पाकिस्तानचे खेळाडू भारतीय कोचला भिडले. 45 व्या मिनिटाला हा प्रसंग घडला. पाकिस्तानी खेळाडू जेव्हा थ्रो इन घेत होते, तेव्हा भारतीय कोच इगोर स्टिमॅक यांनी चेंडूला हात मारला.. त्यानंतर पाकिस्तानचे खेळाडू भारतीय कोचसोबत भिडले. त्यानंतर भारतीय खेळाडूही आले. दोन्ही संघाच्या खेळाडूमध्ये धक्काबुक्की झाली.

थोड्यावेळानंतर भारत आणि पाकिस्तान संघातील हे प्रकरण शांत झाले. त्यानंतर रेफरीने भारतीय कोच इगोर स्टिमॅक यांना रेड कार्ड दिले. तर पाकिस्तानच्या कोचला येलो कार्ड दाखवले. तसेच भारतीय डिफेंडर संदेश झिंगन आणि पाकिस्तानचा मिड फिल्डर राहिस नबी या दोघांनाही येलो कार्ड दाखवले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.