Inning of 498 Runs : अठरा वर्षीय द्रोणची ४९८ धावांची खेळी, ८६ चौकारांची आतषबाजी

Inning of 498 Runs : द्रोण ४५० धावा करणारा सहावा फलंदाज ठरला आहे.

72
Inning of 498 Runs : अठरा वर्षीय द्रोणची ४९८ धावांची खेळी, ८६ चौकारांची आतषबाजी
  • ऋजुता लुकतुके

शालेय क्रिकेटमध्ये एका डावात ४९८ धावा करत गुजरातच्या १८ वर्षीय द्रोण देसाईने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ क्रिकेट या अहमदाबादमधील क्रिकेट मंडळाने आयोजित केलेल्या स्पर्धेत द्रोणने ही कामगिरी केली. ही स्पर्धा गुजरात क्रिकेट असोसिएशनची अधिकृत स्पर्धा आहे. त्यामुळे द्रोणची कामगिरी बीसीसीआयच्या शालेय क्रिकेटच्या विक्रमांमध्ये नोंदली जाईल. डावात ४५० पेक्षा जास्त दावा करणारा द्रोण हा सहावा युवा फलंदाज ठरला आहे. सेंट झेवियर्सकडून खेळताना द्रोणने ३२० चेंडूंत ७ षटकार आणि ८६ चौकार लगावत ४९८ धावा पूर्ण केल्या.

शालेय स्तरावर सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या रचण्याचा विक्रम अजूनही मुंबईच्या प्रणव धनवडेच्या नावावर आहे. त्याने नाबाद १००९ धावा केल्या होत्या. त्या खालोखाल पृथ्वी शॉ (५४६), डॉ. हवेवाला (५१५), चमनलाल (नाबाद ५०६) आणि अरमान जाफर (४९८) यांचा क्रमांक लागतो. (Inning of 498 Runs)

(हेही वाचा – सलग ५ वेळा उपमुख्यमंत्री झाल्याचा Ajit Pawar यांना गर्व; म्हणाले…)

जानेवारी २०१६ मध्ये, भंडारी कपमध्ये खेळताना, प्रणवने केसी गांधी स्कूलसाठी आर्य गुरुकुल विरुद्ध ३२७ चेंडूत १२९ चौकार आणि ५९ षटकारांच्या मदतीने ही खेळी खेळली. जी शालेय स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या आहे. मुंबईजवळ कल्याण इथं हा सामना झाला होता.

५०० धावा करण्यात आपण कमी पडलो याचा आनंद नसल्याचे देसाईने सामन्यानंतर सांगितले. मैदानात स्कोअरबोर्ड नव्हता आणि माझ्या संघाने मला सांगितले नाही की मी ४९८ धावांवर फलंदाजी करत आहे, मी नको तो फटका खेळलो आणि आऊट झालो, पण मला आनंद आहे की मी इतक्या धावा करू शकलो. (Inning of 498 Runs)

(हेही वाचा – Sleep Internship Program मध्ये झोपेतच केली ९ लाखांची कमाई)

द्रोणने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी वयाच्या ७ व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि माझ्या वडिलांनी मला नेहमीच पाठिंबा दिला कारण त्यांना वाटत होते की माझ्यात एक चांगला क्रिकेटर बनण्याची क्षमता आहे. ते मला जेपी सरांकडे घेऊन गेले. क्रिकेटमध्येच कारकीर्द घडवण्याची द्रोणची इच्छा आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.