धक्कादायक! कबड्डी सामन्यादरम्यान गोळीबार, आंतरराष्ट्रीय पातळीच्या खेळाडूचा मृत्यू

165

पंजाबमधील जालंधरमध्ये देशाला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. जालंधरमध्ये एका आंतरराष्ट्रीय पातळीवरील कबड्डी खेळाडूची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळी जालंधरच्या मालिया गावात एका कबड्डीच्या सामन्यादरम्यान कबड्डीपटू संदीप नंगल अंबियावर अज्ञातांनी हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या घटनेनंतर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, संदीपच्या डोक्यावर आणि छातीवर जवळपास 20 राऊड फायर करण्यात आले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. संदीपवर गोळ्या झाडल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये गोळ्याच्या आवाजानंतर लोकांची धावपळ उडाल्याचेही दिसतेय. अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्यानंतर उपस्थित लोकांनी संदीपला तात्काळ रुग्णालयात नेलं. पण मोठ्या प्रमाणात रक्तश्राव होत असल्यामुळे संदीपने रस्त्यातच जीव सोडला.

(हेही वाचा – ‘द काश्मीर फाईल्स’वर पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?)

बघा व्हिडिओ – 

एक दशक संदीपने केलं कबड्डीमध्ये राज्य

संदीपला लहानपणापासूनच कबड्डीची आवड होती. त्यांच्या चाहत्यांमध्ये संदीप ग्लेडिएटर नावाने प्रसिद्ध होता. एक दशक संदीपने कबड्डीमध्ये राज्य केले आहे. संदीप पंजाबशिवाय, कॅनडा, यूएसए आणि यूकेमध्येही खेळला आहे. आपल्या खेळाच्या जोरावर संदीपचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले होते. त्याची अॅथलेटिक प्रतिभा आणि कबड्डीतील नैपुण्यामुळे त्याला डायमंड स्पर्धक म्हणूनही ओळखलं जात होतं. मृत्यूपूर्वी संदीप कबड्डी फेडरेशनचं व्यवस्थापन पाहत होता. दरम्यान, या घटनेतील हल्लेखोर नेमके कोण आहेत? याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. तसेच त्याच्या हत्येमागील कारणही अद्याप समजू शकलेले नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगितेल जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.