चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघ त्यांचे सर्व सामने फक्त एकाच ठिकाणी दुबईमध्ये (Dubai) खेळणार आहे. राजकीय तणाव आणि सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्याची परवानगी दिली नाही. ज्यामुळे आयसीसीने (International Cricket Council) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (Pakistan Cricket Board) दुबईमध्ये टीम इंडियाचे सर्व सामने आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले. (Inzamam-ul-Haq)
( हेही वाचा : Pop Idol : कलेसोबतच पर्यावरण रक्षण आणि सणाचे पावित्र्यही महत्त्वाचे)
इंजमाम उल हकने बीसीसीआयविरुद्ध विष ओकले
त्यातच आता इंजमाम-उल-हकने (Inzamam-ul-Haq) आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. इंजमाम उल हकने आयपीएलवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. इंजमाम उल हक म्हणाले की, भारत आपल्या खेळाडूंना परदेशी लीगमध्ये भाग घेऊ देत नाही, परंतु परदेशी देशांचे खेळाडू आयपीएलमध्ये (Indian Premier League) खेळतात. चॅम्पियन्स ट्रॉफी बाजूला ठेवा. आयपीएलमध्ये अव्वल खेळाडू भाग घेतात, परंतु भारतीय खेळाडू इतर लीगमध्ये भाग घेत नाहीत, अशी टीका करत आयपीएलवर बहिष्कार घालण्याचे त्यांनी आवाहन केले.
इंजमाम उल हक (Inzamam-ul-Haq) पुढे म्हणाले, इतर क्रिकेट बोर्डांनी त्यांचे खेळाडू आयपीएलमध्ये पाठवणे थांबवावे. जर तुम्ही तुमचे खेळाडू लीगसाठी पाठवले नाहीत, तर इतर मंडळांनीही यावर भूमिका घ्यावी. बीसीसीआयच्या करारानुसार, कोणताही भारतीय खेळाडू परदेशी लीगमध्ये खेळू शकत नाही जोपर्यंत तो क्रिकेटपटू भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत नाही, ज्यामध्ये आयपीएल आणि देशांतर्गत स्पर्धांचा समावेश आहे, असे ही इंजमाम म्हणाले. त्यामुळे आयपीएलवर बहिष्कार टाका, असे आवाहन इंजमाम उल हक याने जगातील क्रिकेट मंडळांना केले आहे. (Inzamam-ul-Haq)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community