IOC on Vinesh Phogat : ‘विनेश प्रकरणाला मानवी बाजू. पण….’ थॉमस बाख आणखी काय म्हणाले?

IOC on Vinesh Phogat : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी विनेश प्रकरणावर मौन सोडलं

119
IOC on Vinesh Phogat : ‘विनेश प्रकरणाला मानवी बाजू. पण….’ थॉमस बाख आणखी काय म्हणाले?
IOC on Vinesh Phogat : ‘विनेश प्रकरणाला मानवी बाजू. पण….’ थॉमस बाख आणखी काय म्हणाले?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटचं वजन १०० ग्रॅम जास्त भरल्यामुळे ५० किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठूनही ती अपात्र ठरली होती. त्यामुळे तिचं पदक हुकलं. त्यानंतर विनेशने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे याविषयी दाद मागितली आहे. दोन फ्रेंच वकील आणि हरिश साळवे तसंच विदुश्पद सिंघानिया यांनी विनेश आणि भारतीय पथकाची बाजू मांडली. स्पर्धेचे दोन दिवस विनेश सोबत नेमकं काय काय झालं आणि तिचा याआधीची कुस्तीतील कामगिरी याविषयी हरिष साळवे यांनी लवादासमोर सुमारे एक तास माहिती दिली. विनेशही व्हीडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे या सुनावणीला हजर होती. (IOC on Vinesh Phogat)

(हेही वाचा- Raj Thackeray Visit :  ‘मराठा विरुद्ध मनसे’ वाद लावण्याचे उबाठाचे षडयंत्र)

आता ही स्पर्धा संपेपर्यंत आपला निकाल देऊ असं क्रीडा लवादाने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, हे प्रकरण सुरू असताना पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख (Thomas Bach) यांनी आपलं मत नोंदवलं आहे. (IOC on Vinesh Phogat)

 ‘विनेश प्रकरणाचा मानवी पैलू आहे. हे मी मान्य करतो. त्यासाठी मलाही तिच्याबद्दल सहानुभूती आहे. पण, असं एकेका खेळाडूसाठी आपण नियम शिथील करत गेलो, तर त्याचे परिणाम काय होतील, असा विचारही मी करतो. आता अंतिम निर्णय क्रीडा लवाद घेईल,’ असं बाख यांनी सांगितलं. त्याचबरोबर एका स्पर्धेत एका क्रीडा प्रकारात दोन रौप्य पदकं दिली जाऊ शकत नाहीत, असा निर्वाळाही त्यांनी दिला. (IOC on Vinesh Phogat)

(हेही वाचा- Paris Olympic 2024 : अंतिम पनघल भारतात परतली, निर्दोष असल्याचा केला दावा )

कारण, विनेशने क्रीडा लवादाकडे अपील करताना आपल्याला रौप्य दिलं जावं, अशीच मागणी केली आहे. आणि नियमांनुसार, विनेश बाद झाल्यावर तिने उपान्त्य लढतीत विजय मिळवलेल्या गुझमान लोपेझला अंतिम फेरीत प्रवेश दिला जाऊन ती स्पर्धा सध्या पार पडली आहे. आणि अमेरिकन हिंडरबाखने स्पर्धेत सुवर्णही जिंकलं आहे. (IOC on Vinesh Phogat)

विनेशला आंतरराष्ट्रीय स्तरावर माजी खेळाडूंकडून काही अंशी पाठिंबा मिळाला आहे.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.