विराटमुळे गमवावी लागली चाहत्याला गर्लफ्रेन्ड, मैदानावरच झळकावले पोस्टर!

118

सध्या आयपीएल 2022 चा खेळ रंगला आहे. गुरुवारी केकेआर आणि आरसीबीचा सामना अनेक गोष्टींमुळे अविस्मरणयी ठरला. केकेआरविरुद्धची बाजी आरसीबीने तीन गडी राखून जिंकली. दिनेश कार्तिकने आंद्रे रसेलला षटकार खेचून सामना संपवला आणि रसेल मैदानावरच झोपला. सामना जिंकण्यासोबतच अनेक गोष्टीमुंळे हा सामना चर्चेत आला आहे.

विराटमुळे गर्लफ्रेन्ड गेली सोडून

केकेआर विरुद्धच्या या सामन्यात आरसीबीकडून खेळणा-या हर्षल पटेल याने 11 धावांत दोन गडी बाद करताच विराट कोहलनीने त्याच्या डोक्याचे चुंबन घेतले. त्याचवेळी प्रेक्षक गॅलरीतील एका चाहत्याने लक्ष वेधले. त्याने जे पोस्टर झळकावले त्यावर लिहिले होते, माझ्या गर्लफ्रेन्डने विराट कोहलीमुळे मला सोडले कारण गर्लफ्रेन्डपेक्षा जास्त वेळ मी विराट कोहलीला देत होतो. सध्या या पोस्टरची सर्वत्र चर्चा आहे.

( हेही वाचा: हिंदू नववर्षाची सुरुवात वीर सावरकरनिर्मित भगव्या ध्वजाची गुढी उभारुन करा! )

तर या सामन्याचा निकाल वेगळा असता

शेवटच्या षटकापर्यंत रंगललेल्या सामन्यात अखेर आरसीबीने चार चेंडू आणि तीन विकेट राखून विजय मिळवला. दिनेश कार्तिकने आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 128 या छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना आरसीबीला संघर्ष करावा लागला. कॅप्टन फाफ डु प्लेसिस, विराट कोहली असे मोठे फलंदाज असलेल्या आरसीबीला कोलकाता नाइट रायडर्सच्या  गोलंदाजांनी चांगलेच सतावले. आणखी 15-20 धावा कोलकात्याने केल्या असत्या, तर या सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.