आयपीएलचा यंदाचा (IPL 2023) हंगाम बऱ्याच कारणाने गाजत आहे. यावेळी अनेक रेकॉर्ड झाले, थरारक लढती पाहायला मिळाल्या. अशातच सोमवार १ मे रोजी लखौन विरूद्ध बंगळूरची लढत वेगळ्याच कारणाने रंगली. लखौनच्या भारतररत्न अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बंगळुरने विजय मिळवला. लखनौच्या घरच्या मैदानावर बंगळूर संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
(हेही वाचा – Badminton Asia Championship : तब्बल ५८ वर्षांनंतर भारताची ‘सुवर्ण’ कामगिरी)
प्रथम फलंदाजी करताना लखनौच्या गोलंदाजांनी आरसीबीवर चांगलाच वचक बसवला आणि त्यांनी ९ बाद १२६ धावा केल्या. तर लखनौला विजयासाठी सर्वात कमी १२७ धावांचे लक्ष्य दिले. याचा पाठलाग करताना लखौनची खराब सुरूवात झाली. अवघ्या ३५ धावांमध्ये लखौनचे ४ फलंदाज माघारी परतले,त्यामुळे त्यांना केवळ १०८ धावाच करता आल्या. पण यानंतर मैदानावर वाद झाले. (IPL 2023)
नक्की काय घडले?
या वादाची खरी सुरुवात लखौन आणि बंगळूर च्या पहिल्या सामन्यावेळीच झाली होती, जेव्हा गौतम गंभीरने सामना जिंकल्यानंतर प्रेक्षकांना हाताने गप्प बसण्याचा इशारा केला होता. त्यानंतर सोमवारी लखौन आणि बंगळुरचा दुसऱ्यांदा सामना झाला, त्यात सुरूवातीपासूनच वातावरण चांगलेच तापले होते. दुसऱ्या इंनिगच्या १७ व्या षटकात लखनौचा फलंदाज नवीन उल हक आणि विराट कोहली यांच्यात वादावादी झाली. १७ व्या ओव्हरमध्ये त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. मात्र या वेळेस अमित मिश्रा आणि पंचानी मध्यस्थी केली आणि वाद तातपूरता मिटला. मात्र विराट आणि नवीनच्या डोक्यात हा विषय होता. सामना संपल्यानंतर गौतम गंभीर याने जेव्हा विराटशी हस्तांदोलन करताना हात झटकला, त्यानंतर नवीन बरोबर हस्तांदोलन करताना विराट सोबत बाचाबाची झालेली दिसली. पण इथेही जरा मध्यस्थी झाली आणि विषय संपला.(IPL 2023)
हेही पहा –
त्यानंतर खरी वादाला सुरुवात झाली. आधीच १७ व्या ओव्हरचं प्रकरण, त्यानंतर हस्तांदोलन. आता थेट विराट आणि गौतम गंभीरच आमनेसामने आले. दोघांनी एकमेकांची बाजू सांगण्याचा प्रयत्न केला असावा. मात्र हे चित्र पाहून हे मारामारी करतात की काय, असंच वाटत होते. पण सुदैवाने तसे काही झाले नाही. (IPL 2023)
२०१३ ची पुनरावृती
विराट आणि गंभीर दोघेही दिल्लीकर. हे दोघे पहिल्यांदा आयपीएल २०१३ मध्ये आमनेसामने भिडले होते. तेव्हा गंभीर केकेआरकडून खेळत होता. तर विराट आरसीबीचाच भाग होता. तेव्हापासून या दोघांमध्ये गर्मागर्मीचे वातावरण असते. (IPL 2023)
दरम्यान या सर्व प्रकारामुळे विराट आणि गंभीरला सामन्याच्या मानधनात १०० टक्के पैसे तर नवीनचे ५० टक्के कपात करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community