IPL 2023 CSK vs GT : कोण होणार विजयी? आज होणाऱ्या सामन्यावरही पावसाचे सावट

आयसीसी टूर्नामेंटमध्ये फायनल (IPL 2023 CSK vs GT) रद्द झाल्यावर ट्रॉफी शेअर केली जाते, पण आयपीएलबाबत अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

176
IPL 2023 CSK vs GT : कोण होणार विजयी? आज होणाऱ्या सामन्यावरही पावसाचे सावट

यंदाचा आयपीएल (IPL 2023 CSK vs GT) हंगाम हा बऱ्याच गोष्टींसाठी चर्चेत राहिला. कधी सामन्यानंतरच्या वादामुळे तर कधी सामन्यातील थरारक खेळीमुळे. अशातच आता या पर्वातील अंतिम सामना देखील चर्चेत आहे. काल म्हणजेच २८ मे रविवारी आयपीएलचा अंतिम सामना होणार होता मात्र अवकाळी पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे अंतिम सामना आज सोमवार २९ मे रोजी होणार आहे. मात्र आजच्या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(हेही वाचा – व्हॉट्सअ‍ॅपमुळे मैत्री होणार पक्की, येणार आहे ‘हे’ खास फिचर)

एकीकडे चेन्नई 10व्यांदा अंतिम सामना (IPL 2023 CSK vs GT) खेळणार आहे, तर चेन्नई संघाने 4 वेळा विजेतेपद पटकावले आहे. तर दुसरीकडे गतविजेत्या गुजरातने सलग दुस-या वर्षी अंतिम फेरी गाठली आहे.

आज पुन्हा पाऊस पडला तर काय होईल ?

सामना रात्री 9.35 वाजता सुरू झाला तरी पूर्ण 20 षटकांचा खेळ होईल.
सामना 9:35 नंतर सुरू झाल्यास ओव्हर्स कमी होतील.
सामना 9:45 वाजता सुरू झाल्यास 19 षटकांचा, 10 वाजता सुरू झाल्यास 17 षटकांचा आणि 10:30 वाजता सुरू झाल्यास 15-15 षटकांचा सामना होईल.
कट ऑफची वेळ रात्री 12:06 पर्यंत राहील, जर तोपर्यंत 5-5 षटकांचा खेळ सुरू झाला नाही तर सामना रद्द केला जाईल.

हेही पहा – 

अंतिम फेरी रद्द झाल्यास काय होणार?

आयसीसी टूर्नामेंटमध्ये फायनल (IPL 2023 CSK vs GT) रद्द झाल्यावर ट्रॉफी शेअर केली जाते, पण आयपीएलबाबत अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. इतर कोणताही प्लेऑफ सामना रद्द झाल्यास, गुणतालिकेत शीर्षस्थानी असलेला संघ विजेता मानला जातो, परंतु अंतिम फेरीसाठी असे काहीही सांगितले गेले नाही. पण फायनल रद्द झाल्यास आयपीएलमध्येही ट्रॉफी विभागून दिली जाऊ शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.