IPL 2023 : राजस्थान रॉयल्सच्या ‘या’ खेळाडूने केले नियमांचे उल्लंघन

प्रथम फलंदाजी करताना केकेआरने व्यंकटेश अय्यरच्या ५७ धावांच्या उत्कृष्ट अर्धशतकी खेळीमुळे २० षटकात ८ गडी गमावून १४९ धावा केल्या

366
IPL 2023 : राजस्थान रॉयल्सच्या 'या' खेळाडूने केले नियमांचे उल्लंघन

राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जोस बटलरला आयपीएलच्या (IPL 2023) आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या १० टक्के इतका दंड ठोठावण्यात आला आहे.

जोस बटलरने कबूल केला गुन्हा

११ मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२ अंतर्गत लेव्हल १ गुन्ह्यासाठी बटलर दोषी आढळला आहे. यानंतर बटलरने आपला गुन्हा कबूल केला आहे. आचारसंहितेच्या लेव्हल १ भंगासाठी, सामनाधिकाऱ्याचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.

(हेही वाचा – Asia Cup 2023 : पाकिस्तानात खेळवला जाण्याची शक्यता धूसर  )

या सामन्यात केकेआरचा पराभव झाला

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआरने व्यंकटेश अय्यरच्या ५७ धावांच्या उत्कृष्ट अर्धशतकी खेळीमुळे २० षटकात ८ गडी गमावून १४९ धावा केल्या. (IPL 2023)

हेही पहा – 

राजस्थान रॉयल्स विजयी 

प्रत्युत्तरात राजस्थानने १३.१ षटकात १ गडी गमावून १५१ धावा केल्या आणि सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या ४७ चेंडूत झंझावाती नाबाद ९८ आणि संजू सॅमसनच्या नाबाद ४८ धावांच्या जोरावर ९ गडी राखून विजय मिळवला. (IPL 2023)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.