IPL टी-२० क्रिकेट स्पर्धेचा लिलाव शुक्रवारी कोचीत रंगणार आहे. दुपारी २.३० पासून या लिलावाला सुरूवात होणार आहे. या मिनी लिलामध्ये एकूण ४०५ खेळाडूंचा सहभाग असणार आहे. यात २७३ भारतीय तर १३२ परदेशी खेळाडू असणार आहेत. या लिलावातून जास्तीत जास्त ८७ खेळाडूंची खरेदी करण्यात येईल. यात ३० परदेशी खेळाडूंचा समावेश असेल.
( हेही वाचा : शूटिंगमधून मध्य रेल्वेने कमावले कोट्यावधी; ‘या’ चित्रपटांचे झाले चित्रीकरण)
इंग्लंडचा २४ वर्षीय अष्टपैलू सॅम करनला सर्वाधिक किंमत या लिलावात मिळू शकते असे वर्तवण्यात येत आहे. दुखापतीमुळे तो गेल्या वर्षीच्या IPL मध्ये खेळू शकला नव्हता. तसेच बेन स्टोक्स आणि हॅरी ब्रूक यांनाही या IPL मध्ये मोठी किंमत मिळू शकते.
प्रत्येक संघात किमान १८ आणि जास्तीत २५ खेळाडू असतात. सुरूवातीला लिलावात ८६ नावे घेतली जातील त्यानंतर लिलावाचा दुसरा टप्पा सुरू होईल. ज्या खेळाडूंची खरेदी झाली नाही, त्यांची नावे अखेरच्या टप्प्यात पुन्हा घेतली जातील.
लिलावातील संघांची रक्कम
संघ – शिल्लक रक्कम
- चेन्नई – २०.४५ कोटी
- दिल्ली – १९.४५ कोटी
- गुजरात – १९.२५ कोटी
- कोलकाता – ७.०५ कोटी
- लखनऊ – २३.३५ कोटी
- मुंबई – २०.५५ कोटी
- पंजाब – ३२.२० कोटी
- राजस्थान – १३.२० कोटी
- बंगळुरू – ८.७५ कोटी
- हैदराबाद – ४२.२५ कोटी