IPL 2023: मुंबई इंडियन्सची बिकट अवस्था

159

आयपीएलचा थरार सुरू झाला असून एकामागून एक सामना रंगत आहे. प्रत्येक मोसमात हाय वोल्टेज असणारा सामना म्हणजे मुंबई आणि चेन्नईनचा. हा सामना वानखेडे स्टेडियमवर सुरू झाला असून चेन्नईने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. माञ त्याआधी मुंबईच्या संघातून वाईट घटना समोर आली आहे, मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूला दुखापत झाली आहे.

मुंबईच भविष्य घोक्यात

मुंबईचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराह हा आधीच या मोसमातून बाहेर पडला आहे. त्यामुळे बॉलिंगची पूर्णपणे जबाबदारी ही जोफ्रा आर्चर याच्याकडे आहे. पण त्याला सराव करताना दुखापत झाली. अशी माहिती एस बद्रीनाथ याने आपल्या युट्यूब चॅनेलवर दिली. त्यामुळे जोफ्रा चेन्नई विरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. त्यामुळे मुंबईची बॉलिंग अधिक कमकुवत झाली आहे.

या मोसमातला मुंबईचा दुसरा सामना आहे. मुंबईला पहिल्या सामन्यात आरसीबीकडून पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे आता मुंबईला पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. मुंबईचा संघ स्लो स्टार्टर म्हणून ओळखल जातो.

मुंबईची बिकट अवस्था

हाती आलेल्या शेवटच्या वृतानुसार मुंबईचे आठ विकेट गेले असून फक्त १५७ रन्स झाले आहेत. पावरप्लेमध्ये झालेल्या चांगल्या सुरुवातीनंतर मुंबईची बॅटिंग कोसळली. आता मुंबईचे बॉलर काय जादू करतात हे बघणे महत्त्वाचं ठरेल.

(हेही वाचा – मुंबई इंडियन्सला आणखी एक धक्का)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.