IPL2023 : मुंबई इंडियन्सने पोलार्डसह ५ खेळाडूंना केले बाहेर; चेन्नईने जडेजाबाबत काय भूमिका घेतली?

मुंबई इंडियन्सने आपल्या ५ खेळाडूंना मिनी लिलावाच्या आधीच करारमुक्त केले आहे, तर चेन्नईने आपल्या ४ खेळाडूंना करारमुक्त केल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज कायरन पोलार्डला यंदा करारमुक्त केल्यामुळे हा निर्णय धक्कादायक असल्याचे मानले जात आहे. पोलार्ड हा २०१० पासून मुंबईसोबत खेळत आहे. मुंबईने जिंकलेल्या पाच विजेतेपदाच्या संघात त्याचा समावेश होता. २०२२ मध्ये त्याला ११ सामन्यात केवळ १४४ धावा करता आल्या याचा संघाला फटका बसल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

( हेही वाचा : T20 Final : इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान मॅचच्या २४ तास आधी ICC ने केला गेमचेंज; पाऊस पडला तर कोण जिंकणार? )

मुंबई इंडियन्सने ५ खेळाडूंना केले करारमुक्त; १० खेळाडू रिटेन

मुंबईकडून टायमल मिल्स, फॅबियन एलन, शोकीन, मयंक मार्कंडे आणि कायरन पोलार्ड यांना करारमुक्त करण्यात आले आहे. असे असले तरी या ५ जणांवर ऑक्शनमध्ये बोली लावण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, इशान किशन, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा आणि डॅनियल सॅम्स यांना संघात कायम ठेवले आहे.

दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जने रविंद्र जाडेजाला संघ सोडून जाण्यापासून रोखले आहे. मध्यतंरी चेन्नई आणि जाडेजामध्ये दुराव्याच्या बातम्या आल्या होत्या परंतु चेन्नईने जाडेजाला कायम ठेवले आहे. चेन्नईन धोनी, रविंद्र जाडेजा, मोईन अली, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवॉय, मुकेश चौधरी, इवेन प्रिटोरियस, दीपक चाहर यांना रिटेन केले आहे. २३ डिसेंबरला कोचीमध्ये मिनी लिलाव होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here