आयपीएल (IPL 2023) च्या हंगामाला क्रिकेटप्रेमींचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगत असल्याने कोणते ४ संघ क्वालिफाय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु या दरम्यान मानाची ऑरेंज आणि पर्पल कॅप मिळवण्यासाठी खेळाडूंमध्ये चुरस रंगली आहे. संपूर्ण सीझनमध्ये जो बॅटर सर्वाधिक धावा करतो त्याला ऑरेंज कॅप आणि जो बॉलर सर्वाधिक विकेट काढतो त्याला पर्पल कॅप दिली जाते. सध्या या शर्यतीत असलेले ५ खेळाडू कोण आहेत ते पाहूया…
( हेही वाचा : RTE Admission : आरटीई अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ)
IPL 2023 ऑरेंज कॅपसाठी दावेदार खेळाडू
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा RCB च्या फाफ डू प्लेसिस याने केल्या आहेत. तब्बल ४२२ धावांसह फाफ पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे सध्या ऑरेंज कॅप डु प्लेसिसकडे आहे. या मागोमाग दुसऱ्या क्रमांकावर सुद्धा RCB आणि टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आहे. त्याने आठ सामन्यांमध्ये ३३३ धावा केल्या आहे. यानंतर डेवॉन कॉनवे, डेव्हिड वॉर्नर आणि व्यंकटेश अय्यर यांचा क्रमांक लागतो. परंतु ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या खेळाडूंच्या धावांमध्ये १०० धावांचा फरक आहे. त्यामुळे फाफ डू प्लेसिसचा फॉर्म कायम राहिल्यास त्याच्याकडून कोणीही ऑरेंज कॅप हिरावून घेऊ शकत नाही.
पर्पल कॅपसाठी शर्यत
पर्पल कॅप सुद्धा सध्या RCB आणि वनडे मधील टीम इंडियाचा नंबर १ चा गोलंदाज मोहम्मद सिराजकडे आहे. त्याने आठ सामन्यांमध्ये सर्वाधिक १४ विकेट्स घेतल्या आहे. यानंतर रशिद खान, अर्शदीप सिंह, वरूण चक्रवर्ती, तुषार देशपांडे हे गोलंदाज IPL 2023 च्या हंगामात पर्पल कॅपच्या शर्यतीत आहे.
हेही पहा :
Join Our WhatsApp Community