IPL 2023 : अन्यथा RCB चा लखनौविरुद्ध झाला असता विजय; दिनेश कार्तिकच्या एका चुकीमुळे गेमचं फिरला

94

आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला ३१ मार्चपासून सुरूवात झाली आहे. प्रत्येक सामना हा रंगतदार होत असून अनेक रेकॉर्ड मोडले जात आहेत. रविवारी झालेल्या कोलकात्या विरूद्ध गुजरातच्या सामन्यात आपल्याला रिंकू सिंहचा अप्रतिम खेळ पहायला मिळाला. त्यात निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे शेवटच्या चेंडूपर्यंत सांगणं अवघड होतं. असाच एक उत्कांटवर्धक सामना सोमवारी आपल्याला पहायला मिळाला. सोमवारी बंगळुरू विरूद्ध लखनौ ही रोमांचकारक लढत अनुभवण्यास मिळाली.

( हेही वाचा : राज्य सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा! २८ जिल्ह्यांना एकूण १७७ कोटींची मदत जाहीर )

RCB ने प्रथम फलदांजी करताना २१२ धावांचे आव्हान लखनौ समोर ठेवले यावेळी विराट कोहली, फॅफ ड्यु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या तडाखेबंद खेळीमुळे बंगळूरूची धावसंख्या २१२ पर्यंत पोहोचली. लखनौची जेव्हा फलंदाजी आली तेव्हा मोहम्मद सिराजने लखनौचा सलामीवीर काइल मेयर्सला शून्यावर बाद केले. त्यानंतर वेन पार्नेलने एकाच षटकात दीपक हुडा आणि कृणाल पंड्याला बाद केले. परंतु लखनौचा डाव मार्कसन स्टॉयिनस आणि निकोलस पुरन यांनी सावरला. दोघांनी तुफानी अर्धशतकी खेळी करत लखनौला विजयाच्या समीप आणून ठेवले. लखनौ हा सामना एकहाती जिंकेल असे वाटत असतानाच पूरन आणि त्यानंतर आयुष बदोनी दोघेही बाद झाले. सामन्याने पुन्हा रंजक वळण घेतले. अखेरच्या चेंडूपर्यंत हा सामना खेळला गेला. कदाचित हा सामना बंगळूरू जिंकू शकली असती पण दिनेश कार्तिकची एक चूक बंगळूरूला महागात पडली.

दिनेश कार्तिकचं काय चुकलं? 

हर्षल पटेल शेवटचं षटक टाकत होता. सहा चेंडूत पाच धावांची आवश्यकता लखनौला होती त्याचवेळी जयदेव उनाडकट बाद झाला. लखनौवर दबाव वाढत होता, मैदानात आलेल्या रवी बिश्नोईने दोन चोरट्या धावा घेतल्या. शेवटच्या चेंडूवर लखनौला एक धाव हवी होती. आवेश खान शेवटच्या चेंडूचा सामना करत होता. चेंडू मागे असलेल्या यष्टिरक्षक दिनेश कार्तिककडे गेला पण त्याला तो चेंडू नीट पकडता न आल्याने आवेश खान आणि रवी बिश्नोईला एक धाव काढता आली आणि हा सामना लखनौने एक गडी राखून जिंकला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.