आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये आता केवळ दोन सामने शिल्लक आहेत. अंतिम सामन्याच्या आधीचा दुसरा क्वालिफायर सामना 26 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गुजरात टायटन्स (Gujrat Titans) या दोन संघात हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात GT चा शुभमन गिलवर विश्वास आहे, तर MI चा सुर्यकुमार यादव यावर विश्वास आहे. नरेंद्र मोदी स्टेडिअम या दोघांसाठी भारी आहे.
आयपीएलचा पहिला सामना 2010 मध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला होता. आतापर्यंत येथे 25 सामने खेळले गेले आहेत. गुजरात टायटन्सचा फलंदाज शुभमन गिलने या मैदानावर 62.62 च्या सरासरीने आणि 147.35 च्या स्ट्राइक रेटने सर्वाधिक 501 धावा केल्या आहेत.
आतापर्यंत आयपीएल सामन्यांमध्ये मुंबईच्या सूर्यकुमार यादव समोर गुजरातच्या राशिद खानची गोलंदाजी फिकी पडल्याचे दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे राशिद खान अद्याप सूर्यकुमार यादवला आयपीएलमध्ये बाद करू शकलेला नाही. गोलंदाजीत गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वरचढ आहे. शमीने या मैदानावर सर्वाधिक 18 विकेट घेतल्या आहेत. नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघांनी 12 सामने जिंकले आहेत आणि नंतर फलंदाजी करणाऱ्या संघांनी 13 सामने जिंकले आहेत. या मैदानावर नाणेफेक जिंकणाऱ्या संघांनी 12 सामने जिंकले असून नाणेफेक गमावलेल्या संघाने 13 सामने जिंकले आहेत. गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध दोन गडी गमावून 227 धावा केल्या होत्या. ही नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.
Join Our WhatsApp Community