IPL 2023 : ‘तो’ लिलावात राहिला अनसोल्ड, सामन्यात त्याने दाखवून दिली आपली किंमत! कोण आहे हा खेळाडू?

129

आयपीएल स्पर्धा खऱ्या अर्थाने आता रंगात आली आहे. सलग चार ते पाच दिवसात एकापेक्षा एक असे रंजक सामने झाले आहेत. बुधवारी झालेल्या चेन्नई विरूद्ध राजस्थानच्या सामन्यात पुन्हा एकदा थरार अनुभवायला मिळाला.

( हेही वाचा : दिशा सालियनप्रकरणी कोणाचे हातपाय पकडले? नितेश राणेंचा ठाकरे पिता-पुत्रांना सवाल, लवकरच करणार गौप्यस्फोट)

नाणेफेक जिंकून चेन्नईने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावरप्लेची चांगली सुरूवात झाल्यानंतर राजस्थानच्या डावाला चेन्नईच्या गोलदांजाकडून लगाम घालण्यात आला. जॉस बटलर एका बाजूने टिच्चून फलंदाजी करत होता, नंतर तो ही बाद झाला. शेवटी राजस्थानने १७५ पर्यंत मजल मारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईची सुरूवात खराब झाली. गायकवाड ८ धावांवर बाद झाला. कॉनवे आणि रहाणेने डाव सावरला पण त्यानंतर धावगती कमी झाली. त्यानंतर आलेल्या धोनी आणि जाडेजाने सामना आपल्या बाजूने फिरवला.

संदीपचा करिश्मा

शेवटच्या षटकात चेन्नईला २० धावांची गरज होती. धोनीने दोन षटकार लगावले. सामना चेन्नई जिंकेल असे वाटत असतानाच गेम फिरला. शेवटच्या चेंडूमध्ये पाच धावांची गरज असताना फक्त एक धाव देऊन सामना राजस्थानच्या पारड्यात आला आणि याचे श्रेय एका खेळाडूला जाते. हा खेळाडू म्हणजे संदीप शर्मा. राजस्थानचा संघ मोठ्या दबावाखाली असताना संदीपने हा सामना जिंकून दिला. मूळचा पंजाबचा असलेल्या संदीपने आयपीएल स्पर्धेत कोहलीला तब्बल सातवेळा बाद केले आहे. आपल्या स्विंग करण्याच्या कलेने फलंदाजांची भंबेरी उडवणाऱ्या संदीपने बुधवारी झालेल्या सामन्यात यॉर्कर चेंडू टाकून आपल्यातील चुणूक दाखवली.

लिलावात राहिला अनसोल्ड

संदीप शर्मा राजस्थानच्या मूळ संघात नव्हता. लिलावात तो अनसोल्ड राहिला होता. प्रसिद्ध कृष्णा दुखापतग्रस्त झाल्याने राजस्थानने संदीप शर्माला संघात समाविष्ट केले आणि त्याने परत एकदा स्वत:ला सिद्ध केले. लिलावात अनसोल्ड राहिलेल्या हा खेळाडूमुळे राजस्थानने बलाढ्य चेन्नईवर अगदी सहज मात केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.