आरसीबीसाठी २०२३ची सुरुवात धमाकेदार झाली होती. मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्सने विजय पताका मिरवला होता. त्यानंतर झालेल्या पुढच्या दोन सामन्यांत आरसीबीने मार खाल्ला होता. तरीही त्यापुढे झालेल्या सामन्यात आरसीबीचा परफॉर्मन्स बऱ्यापैकी आशादायक होता. आतापर्यंत झालेल्या बारा सामन्यांपैकी सहा सामने आरसीबीने जिंकले आहेत. त्यामुळे आरसीबीने टॉप फायलमध्ये स्थान मिळवले आहे. चॅलेंजर्स सध्या फॅफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळत आहेत. रॉयल चॅलेंजर्सने बारापैकी सहा सामने जिंकत १२ गुण प्राप्त केले आहेत. आरसीबीचा नेट रन रेट +०.१६६ आहे. जर आरसीबीने पुढील दोन सामने जिंकले तर क्वालिफायर १ मध्ये गुजरात टायटन्सचा सामना करण्याची संधी त्यांना मिळेल. दरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेटर टॉम मूडी विराट कोहलीला प्लेऑफमध्ये टिकून राहण्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
‘आरबीसीला कंबर कसून मैदानात उतरावे लागेल’
एका वृत्तवाहिनीशी झालेल्या संभाषणात ऑस्ट्रेलियन क्रिकेटर टॉम मूडी म्हणाला की, आरसीबीने चांगली सुरुवात केली होती. पण त्यांचा जोश मध्येच कमी झाला. यापुढे त्यांना कंबर कसून मैदानात उतरावे लागेल. त्यांच्याकडे विराट कोहली सारखा खेळाडू आहे, जो आरसीबीला वर आणण्यासाठी काहीही करू शकतो.
(हेही वाचा – Brij Bhushan Singh : ‘ब्रिजभूषण सिंह वडिलांसारखे’; निरीक्षण समितीकडून ब्रिजभूषण निर्दोष)
तिघांच्या पल्याड बघा
यापुढे आरसीबीने एकसंघ होऊन खेळावे लागेल. आरसीबीने कोहली, मॅक्सवेल, फॉफ या तिघांनाच सामन्यांच्या केंद्रस्थानी ठेवले होते. आता संघाला या तीन खेळाडूंच्या पलीकडे बघण्याची आवश्यकता आहे. इतर खेळाडूंना संधी दिली तर ते आरसीबीसाठी जबाबदारीने खेळू शकतील, असे म्हणत मूडीने कोहलीला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community