देशात आयपीएलच्या १६ व्या हंगामाला ३१ मार्चपासून सुरूवात झाली आहे. भारतात आयपीएलचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यात अलिकडे होणाऱ्या रोमांचक सामन्यांमुळे शेवटच्या चेंडूपर्यंत सामना कोण जिंकेल हे सांगणे कठिण होते. शुक्रवारी सुद्धा असाच सामना क्रिकेटप्रेमींना पहायला मिळाला. गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज या दोन संघांमध्ये सामना खेळवण्यात आला. यावेळी शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरातने हा सामना जिंकला. मात्र भारताचा माझी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने शुभमन गिलच्या डावावर नाराजी व्यक्त केली आहे.
शुभमनने या सामन्यात ४९ चेंडूत ६७ धावा केल्या. मात्र त्याच्या या धावा संघासाठी नसून त्याच्या एकट्यासाठी होत्या. त्याचा खेळ स्वार्थी आहे. अशा भाषेत सेहवागने गिलवर टीका केली आहे.
( हेही वाचा –IPL 2023 : ‘तो’ लिलावात राहिला अनसोल्ड, सामन्यात त्याने दाखवून दिली आपली किंमत! कोण आहे हा खेळाडू? )
वीरेंद्र सेहवागच्या नाराजीचे नेमके कारण काय ?
शुभमन गिल केवळ आपले अर्धशतक पूर्ण होण्यासाठी फार सावकाश खेळत असल्याचा आरोप सेहवागने केला. सेहवागने म्हटले की; “गिलने त्याचे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी १० चेंडू अधिक खर्च केले आणि त्याचा परिणाम संघावर झाला. हे क्रिकेट आहे, जिथे तुम्ही फक्त तुमच्या स्वत:च्या कामगिरीचा विचार करू शकत नाहीत. असेच जर सुरु राहिले तर क्रिकेटकडूनच कधी तुमच्या खेळीवर चपराक बसेल आणि तुम्ही वठणीवर याल हे सांगता येणार नाही.”
गिलने आपल्या अर्धशतकानंतर ९ चेंडूंमध्ये १७ धावा केल्या. त्यावेळी त्याचा स्ट्राइक रेट हा २०० च्या आसपास होता. हाच वेग त्याने आधी ठेवला असता तर याचा संघाला फायदा झाला असता असे सेहवागने म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community