- ऋजुता लुकतुके
इंडियन प्रिमिअर लीग आता जेमतेम १५ दिवसांवर आली आहे. फ्रँचाईजी संघाची सराव शिबीर सुरूही झाली आहेत. पहिला सामना आहे चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघादरम्यान. आणि अशावेळी नवीन चर्चा सुरू झाली आहे ती विराट कोहलीच्या (virat kohli) आयपीएल सहभागाची. एकतर विराट मुलाच्या जन्मानंतर अजूनही भारतात परतलेला नाही. आणि त्यातच सुनील गावसकर यांनी अलीकडेच समालोचन करताना विराट आयपीएल खेळेल की नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. (IPL 2024)
‘विराट (virat kohli) आयपीएल खेळेल का? इंग्लंड विरुद्ध अख्खी मालिका तो खेळलेला नाही. वैयक्तिक कारणांमुळे तो सध्या खेळत नाहीए. असंही होऊ शकतं की, तो आयपीएलही खेळणार नाही,’ असं सुनील गावसकर आयपीएलवर चर्चा करताना म्हणाले होते. गावसकर यांच्या बोलण्यामुळे विराटच्या सहभागावर खरंच अनिश्चितता निर्माण झाली होती. पण, बंगळुरू फ्रँचाईजीतील विराटचा जुना संघ सहकारी आणि मित्र एबी डिव्हिलिअर्सने यावर एक मोठं विधान केलं आहे. (IPL 2024)
(हेही वाचा – Farmer Protest : हातात तलवार घेऊन कोणी आंदोलन करत का? ही अत्यंत लाजिरवाणी बाब…उच्च न्यायालय शेतकऱ्यांवर संतापले)
…तरीही भारतीय संघाने मालिकेत केलं कमबॅक
डिव्हिलिअर्स म्हणतो, ‘नक्की सांगता येत नाही. नेमकं काय आहे ते फाफ आणि अँडी फ्लॉवरच सांगू शकतील. पण, मला विराटने आयपीएलच्या काळात भारतात बोलावलं आहे. त्याला थोडा फलंदाजीचा सराव एकत्र करायचा होता. एवढंच मी सांगू शकतो. त्यावरून मला वाटतं, त्याला खेळायचं आहे.’ थोडक्यात, डिव्हिलिअर्सच्या म्हणण्यानुसार, विराट आयपीएल खेळणार आहे. सुनील गावसकर यांनी या चर्चेदरम्यान आणखी एका मुद्याकडे लक्ष वेधलं आहे. भारतीय संघाची बेंच स्ट्रेंग्थ चांगली आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं गावसकर म्हणाले. (IPL 2024)
‘३ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातही महत्त्वाचे खेळाडू मालिकेत खेळत नव्हते. ती मालिका ऑस्ट्रेलियात सुरू होती. आणि ॲडलेड कसोटीत भारतीय संघ ३६ धावांमध्ये सर्वबाद झाला. पण, प्रमुख खेळाडू (विराट) नसताना भारतीय संघाने मालिकेत कमबॅक केलं. आणि पुढची मेलबर्न कसोटी जिंकून दाखवली. तर त्यानंतरची अनिर्णित राखली. तसंच या मालिकेतही युवा खेळाडूंकडून पहायला मिळालं,’ असं सुनील गावसकर म्हणाले. सुनील गावसकर यांनी या मालिकेतील कामगिरीचं श्रेय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना दिलं. (IPL 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community