IPL 2024 Ashutosh Sharma : जसप्रीत बुमराला षटकार खेचणारा पंजाबचा अनकॅप्ड आशुतोष शर्मा

IPL 2024 Ashutosh Sharma : ६ बाद ७७ वरून पंजाब संघाला आशुतोष शर्माने १८० चा टप्पा ओलांडून दिला. 

251
IPL 2024 Ashutosh Sharma : जसप्रीत बुमराचा षटकार खेचणारा पंजाबचा अनकॅप्ड आशुतोष शर्मा
  • ऋजुता लुकतुके

पंजाब किंग्जचा फलंदाज आशुतोष शर्मा (Ashutosh Sharma) या हंगामात धुवाधार कामगिरी करताना दिसतोय. मुंबई इंडियन्स विरुद्घच्या त्याच्या कामगिरीचं कौतुक पंजाबचा आंतरराष्ट्रीय फिरकीपटू आणि मुंबई इंडियन्स संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंगने केलं आहे. मुंबईने जिंकण्यासाठी १९३ धावांचं आव्हान ठेवलेलं असताना पंजाब किंग्जची अवस्था ५ बाद ७७ अशी झाली होती. पण, पराभव समोर दिसत असताना आशुतोष शर्माने एकहाती लढत देत पंजाबला विजयाच्या जवळ आणलं होतं. अखेर १८ व्या षटकात आशुतोष बाद झाला तेव्हा पंजाबचा लढा संपला. (IPL 2024 Ashutosh Sharma)

इतकंच नाही तर आशुतोषने (Ashutosh Sharma) १३ व्या षटकांत जसप्रीत बुमराला स्विपचा असा फटका मारला की, चेंडू थेट सीमारेषेपलीकडे गेला. हा षटकारही लक्षात राहील असा होता. दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलिअर्स आणि भारताचा सुर्यकुमार यादव यांच्या तोडीचा तो फटका होता. त्याच्या या कामगिरीमुळेच हरभजन त्याच्यावर खुश आहे. (IPL 2024 Ashutosh Sharma)

(हेही वाचा – Madhya Pradesh: बस उलटून २१ सुरक्षारक्षक जखमी, निवडणुकीच्या बंदोबस्तातून परतताना झाला अपघात)

आयपीएलमुळे झालं आशुतोषच्या फलंदाजीच्या शैलीचं चीज

‘जसप्रीत बुमराला चौकार, षटकार ठोकणं सोपं नाही. पण, ते आशुतोषने (Ashutosh Sharma) करून दाखवलं. मुंबई इंडियन्सने सामना जिंकला असला तरी आशुतोषनं मनं जिंकली,’ असं हरभजनने आपल्या युट्यूब चॅनलवर बोलून दाखवलं आहे. सध्या जाणकारांकडून कौतुक झेलणारा आशुतोष काही वर्षांपूर्वीपर्यंत नैराश्याने ग्रासलेला होता, हे सांगितलं तर खरंही वाटणार नाही. त्याची फलंदाजीची शैली फटकेबाजीवर आधारित असल्यामुळे मध्य प्रदेशच्या रणजी संघातून त्याला डच्चू मिळाला होता. क्रिकेट खेळणं हे स्वप्न असलेल्या आशुतोषसाठी हा धक्का पचवणं सोपं नव्हतं आणि तो नैराश्यात गेला. (IPL 2024 Ashutosh Sharma)

पण, मधल्या काळात खेळाडू म्हणून रेल्वेत त्याला नोकरी मिळाली आणि रेल्वेकडून तो रणजी खेळू लागला. इथं त्याने पहिल्याच सामन्यात ११ चेंडूंत अर्धशतक झळकावलं आणि तो प्रकाशझोतात आला. त्यानंतर आयपीएलमुळे (IPL) त्याच्या फलंदाजीच्या शैलीचं चीज झालं आणि पंजाब किंग्जने त्याला चांगली संधीही दिली. २५ वर्षीय आशुतोष या हंगामात सातत्यपूर्ण खेळतोय. मुंबई विरुद्ध २८ चेंडूंत केलेल्या ६२ धावा ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी आहे. (IPL 2024 Ashutosh Sharma)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.