IPL 2024 : आयपीएलचा अंतिम सामना चेन्नईत होणार?

IPL 2024 : आयपीएलचा दुसरा टप्पाही देशातच घेण्यावर बीसीसीआय आग्रही आहे. 

196
IPL 2024, Hardik Pandya: मुंबई संघात दोन तट? हार्दिकच्या ट्रोलिंगवर संघात चर्चा
  • ऋजुता लुकतुके

इंडियन प्रिमिअरचा सतरावा हंगाम काही दिवसांपूर्वीच सुरू झाला आहे. आणि पहिला वीक एंड दणक्यात पार पडला आहे. आता चाहत्यांना अपेक्षा आहे ती दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रकाची. देशात एप्रिल, मे आणि जून महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या कालावधीत आयपीएल भरवणं आणि वेळापत्रक बनवणं हे जिकिरीचं काम आहे. त्यामुळे बीसीसीआय आणि आयपीएल कार्यकारिणीनेही आतापर्यंत २२ मार्च ते ७ एप्रिल असं पंधरा दिवसांचंच वेळापत्रक जाहीर केलं आहे. (IPL 2024)

त्या पुढील टप्पा हा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम पाहून ठरवला जाणार आहे. म्हणजे ज्या राज्यांत तेव्हा मतदानाचा दिवस नसेल, तिथेच आयपीएलचा सामना होऊ शकतो. कारण, आयपीएलच्या सामन्यासाठी सुरक्षा व्यवस्था पुरवावी लागते. आणि मतदानाच्या तारखांना ते शक्य नाही. (IPL 2024)

(हेही वाचा – Holi In Kashi Ayodhya : होळीच्या रंगात रंगली काशीनगरी; अयोध्येत यंदा ५०० वर्षांनी साजरा झाला सण)

वेळापत्रक अजून जाहीर झालेलं नाही

त्यामुळेच दुसऱ्या टप्प्याचं वेळापत्रक जिकिरीचं बनलं आहे. पण, निवडणूक असली तरी बीसीसीआय अजूनही भारतातच दुसरा टप्पा भरवण्यावर ठाम असल्याचं समजतंय. बीसीसीआयमधील सूत्रांच्या हवाल्याने वृत्तसंस्था पीटीआयने म्हटलं आहे. इतकंच नाही तर अंतिम सामना चेन्नईच्या चिदंबरम मैदानात घेण्याचा निर्णयही जवळ जवळ निश्चित झाला आहे. तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर बाद फेरीचे दोन सामने होणार आहेत. (IPL 2024)

अर्थात, हे वेळापत्रक अजून जाहीर झालेलं नाही. आयपीएलची तशी परंपराच राहिली आहे. गतविजेता असलेल्या फ्रँचाईजीच्या घरच्या मैदानावर हंगामातील पहिला सामना आणि अंतिम सामना भरवला जातो. ती परंपरा यंदाही बीसीसीआयला जपायची आहे. चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यंदा शेवटचा आयपीएल हंगाम खेळत आहे. चेन्नईचा संघ बाद फेरीत पोहोचला तर धोनीला घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळता येईल. (IPL 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.