- ऋजुता लुकतुके
चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) मंगळवारी आयपीएलच्या नवीन हंगामापूर्वी चेन्नईत दाखल झाला आहे. आता तो चेन्नई संघाची सराव सत्र आणि बैठका यांना उपस्थित राहील. चेन्नई संघाने गेल्यावर्षी विक्रमी पाचव्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकली होती. धोनी संघात दाखल झाला तो व्हिडिओ चेन्नई सुपरकिंग्ज संघाने ट्विटरवर टाकला आहे. आणि त्याला ‘THA7A धरिसनम’ असा आकर्षक मथळा दिला आहे. (IPL 2024)
#THA7A Dharisanam! 🦁💛#DenComing pic.twitter.com/dJbdsDd6wf
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 5, 2024
कदाचित खेळाडू म्हणून धोनीचा (Mahendra Singh Dhoni) हा शेवटचा आयपीएल हंगाम असेल. गेल्यावर्षीही गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो पूर्ण हंगाम खेळू शकला नव्हता. शेवटच्या टप्प्यातच तो खेळला. पण, तरीही आयपीएल करंडक त्याने संघाला जिंकून दिला होता. धोनी आपली पत्नी साक्षीबरोबर गुजरातच्या जामनगर इथं उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्यात सोहळ्यात सहभागी झाला होता. तिथून तो थेट चेन्नईत दाखल झाला आहे. (IPL 2024)
(हेही वाचा – Ind vs Eng 5th Test : अश्विन आणि बेअरस्टो खेळणार आपली १०० वी कसोटी)
🚁 The helicopter has landed in Chennai, New Role loading 😉
Countdown to March 22 starts now… stay tuned to Star Sports for more ⏳ #MSDhoni pic.twitter.com/Std5919GeI
— Star Sports (@StarSportsIndia) March 5, 2024
चेन्नई संघाने चेन्नईतच आपलं सराव सत्र शनिवारपासून सुरू केलं आहे. दीपक चहर, ऋतुराज गायकवाड, सिमरजीत सिंग, राजवर्धन हांगर्गेकर, मुकेश चौधरी मिळून ८ खेळाडू सध्या या शिबिरात सहभागी झाले आहेत. चेन्नई सुपरकिंग्जचा या हंगामातील पहिला सामना २२ मार्चला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध होणार आहे. (IPL 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community