IPL 2024 Controversial Decisions : ‘पंचांच्या निर्णयावर जशी डीआरएस यंत्रणा असते तशीच पंचांच्या कामगिरीसाठीही हवी’ – माधव गोठोस्कर

IPL 2024 Controversial Decisions : पंचांच्या निर्णयावरून वाद का निर्माण होतात?

169
IPL 2024 Controversial Decisions : ‘पंचांच्या निर्णयावर जशी डीआरएस यंत्रणा असते तशीच पंचांच्या कामगिरीसाठीही हवी’ - माधव गोठोस्कर
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलमध्ये (IPL) अलीकडेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या दरम्यानच्या सामन्यात विराट कोहलीच्या विकेटवरून वाद निर्माण झाला होता. तिसऱ्या पंचांनीही तो चेंडू नोबॉल दिला नाही, यावरून समालोचक आणि माजी खेळाडूंमध्ये चांगलीच जुंपली. विराट कोहलीचा दावा होता की, तो चेंडू त्याच्या कमरेच्या वर उसळलेला म्हणजे नोबॉल होता. त्यामुळे तो झेलबाद झाला असला तरी नोबॉल असल्यामुळे तो बाद नव्हता. (IPL 2024 Controversial Decisions)

पण, तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय गेला आणि त्यांनी क्रिकेटमधील एका नियमावर बोट ठेवलं. चेंडू खेळताना विराट क्रीझच्या ६ इंच बाहेर होता आणि चेंडू धिम्या गतीचा असल्यामुळे पुढे गेल्यावर त्याची उसळी कमी झाली असती, असा निर्वाळा तिसऱ्या पंचांनी दिला. फलंदाज क्रीझमध्ये असताना चेंडू कमरेच्या वर असेल तर तो चेंडू नोबॉल ठरतो, असा एमसीसी क्लबचाही नियम आहे. पण, विराटसारखा खेळाडू बाद दिला गेल्यामुळे त्या निर्णयावरही चर्चा रंगलीच आणि विराटनेही आपल्या भावनांना मैदानातच वाट मोकळी करून दिली. अशावेळी पंचांचे निर्णय चुकीचे ठरू शकतात का? आणि पंच, खेळाडू यांच्यातील नातं कसं असं पाहिजे यावर ‘हिंदुस्थान पोस्ट’ने भारताचे माजी ज्येष्ठ कसोटी पंच माधव गोठोस्कर यांच्याशी चर्चा केली. (IPL 2024 Controversial Decisions)

(हेही वाचा – Viral Video: नवरदेवाचे बूट चोरले म्हणून भर मंडपात मारामारी, पाच जण जखमी)

तंत्रज्ञानाच्या मदतीने पंचांच्या निर्णयाचा फेरआढावा

त्यांनी सुरुवातीलाच विराट कोहलीच्या बाद देण्यावरील आपलं परखड मत मांडलं. ‘निर्णय देताना पंच आपलं कामच करत असतात. आणि अचूक निर्णय देण्यासाठीच काम करतात. पण, त्यातून वाद हा मीडिया, माजी खेळाडू निर्माण करतात. विराट कोहली मोठा खेळाडू आहे. पण, त्याला बाद दिलेलं असल्यामुळे तो चिडला आणि त्याने मैदानातच राग व्यक्त केला. समालोचकांनीही नियम न समजून घेता आगपाखड सुरू केली. या दोघांनीही आपलं वागणं आणि बोलणं यावर थोडा अंकुश ठेवला असता तर असा वाद निर्माणच झाला नसता. तेव्हा वाद पंच नाही बाकीचे निर्माण करतात,’ असं गोठोस्कर यांनी स्पष्टपणे सांगितलं. (IPL 2024 Controversial Decisions)

मैदानावरील पंचांचा निर्णय पटला नसेल तर तिसऱ्या पंचांची मदत घेण्याचा अधिकार खेळाडूंकडे आणि संघांकडे आहे. त्यांनी तो जरुर तो अधिकार वापरावा. तंत्रज्ञानाच्या मदतीने पंचांच्या निर्णयाचा फेरआढावा घेता येऊ शकतो. त्यामुळे वाद निर्माण करण्यापेक्षा या व्यवस्थेवर विश्वास ठेवावा असं माधव गोठोस्कर (Madhav Gothoskar) यांचं म्हणणं आहे. माधव गोठोस्कर हे भारतातील सगळ्यात ज्येष्ठ क्रिकेट पंच मानले जातात. खासकरून १९७० च्या दशकात ते आघाडीचे पंच होते. १९७३ पासून १९८३ पर्यंत त्यांनी भारतातील १५ आंतरराष्ट्रीय कसोटीत पंचाची भूमिका पार पाडली. तर १९८१ मध्ये भारतात पहिला एकदिवसीय सामना इंग्लंड विरुद्ध झाला. त्या सामन्यातही माधव गोठोस्कर यांच्यावर पंच म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. सुनील गावसकर यांच्या सर डॉन ब्रॅडमन यांच्या २९ शतकांची बरोबरी करणाऱ्या विक्रमाच्या सामन्यातही गोठोस्कर पंच म्हणून साक्षीला होते. (IPL 2024 Controversial Decisions)

(हेही वाचा – MNS : मनसेचा महायुतीच्या ‘या’ उमेदवारांना विरोध; प्रचार करण्यास नकार)

पंचांचा दर्जा कमी होत चाललाय…

मैदानाबाहेर खेळाडूंबरोबर मित्रत्वाचे संबंध. पण, मैदानात नियमांचं काटेकोर पालन अशा वागण्यासाठी गोठोस्कर प्रसिद्ध होते. विशेष म्हणजे आताही ९४ व्या वर्षी ते अगदी आयपीएलही टीव्हीवर नियमितपणे पाहतात. अशावेळी भारतीय क्रिकेटमधील स्थित्यंतरे पाहिलेल्या गोठोस्करांना पंचगिरीचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवरही घसरतोय या आरोपाविषयी काय वाटतं? (IPL 2024 Controversial Decisions)

‘खेळाडूने जरा जरी रागावून बघितलं तर पंचांचंच काहीतरी चुकलं असणार असं सगळ्यांना वाटतं. हे खरं नसतं. पण, त्याचवेळी पंचांचा दर्जाही अगदी जागतिक दर्जाचा आहे असंही नाही. मैदानावरील गदारोळ, वेगवेगळे आवाज यामुळे पंचांनाही लक्ष केंद्रीत करायला कठीण जातं. पंचांचा दर्जा कमी होत चाललाय. पण, आताही रोहन पंडित, विनोद शेषन आणि नितीन पटेल हे चांगले पंच आहेत,’ असं मत गोठोस्कर यांनी व्यक्त केलं. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा गोठोस्कर यांनी मांडला. पंचांच्या निर्णयाचा फेरआढावा घेण्यासाठी डिसिझन रिव्ह्यू सिस्टिम असते. तशीच पंचांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी एक यंत्रणा हवी असं त्यांनी आवर्जून सांगितलं. (IPL 2024 Controversial Decisions)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.