- ऋजुता लुकतुके
मनाजोगते षटकार खेचण्याची हातोटी असलेला रोहित शर्मा (Rohit Sharma) आधुनिक क्रिकेटमध्ये याच गुणामुळे वेगळा ठरतो. रविवारच्या सामन्यात ५ षटकार ठोकून आता त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. कारकीर्दीत ५०० षटकार ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या जडेजाला (Ravindra Jadeja) स्विपचा फटका खेळून रोहितने हा विक्रम पूर्ण केला. अर्थात, या यादीत पहिल्या क्रमांकावर ख्रिस गेल (Chris Gayle) आहे. आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी रोहीतला वेगळे प्रयत्न करावे लागतील. कारण, गेलने हजार षटकार ठोकले आहेत. (IPL 2024, CSK vs MI)
(हेही वाचा- Nana Patole: निवडणुकीआधी नाना काही ना काही षडयंत्र रचतात; परिणय फुकेंचा हल्लाबोल)
𝙃𝙞𝙩𝙢𝙖𝙣 for a reason 🙇♂️#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #MIvCSK pic.twitter.com/AyJRslcbGt
— Mumbai Indians (@mipaltan) April 14, 2024
भारतासाठी मात्र ही कामगिरी करणारा रोहित पहिलाच आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये ख्रिस गेलने ४६३ सामन्यांत १०५६ षटकार ठोकले आहेत. तर रोहितचा मुंबईचा साथीदार कायरन पोलार्डने ६८६ सामन्यांत ८६० षटकार ठोकले आहेत. (IPL 2024, CSK vs MI)
टी-२० प्रकारात सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज
ख्रिस गेल – १,०५६ (४६३ सामने)
कायरन पोलार्ड – ८६० (५६०)
आंद्रे रसेल – ६७८
कॉलिन मुन्रो – ५४८
रोहित शर्मा – ५००
(हेही वाचा- IPL 2024, Virat Kohli : विराट, ख्रिस गेल आणि कायरन पोलार्डचा डान्स करतानाचा व्हीडिओ व्हायरल)
रोहित शर्माने (Rohit Sharma) चेन्नई विरुद्ध ६३ चेंडूंत शतक झळकावलं. पण, मुंबईला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून देण्यात तो कमी पडला. त्यामुळे चेन्नईविरुद्ध त्याच्या संघाचा पराभव झाला. रोहित सध्या ३६ वर्षांचा आहे. पण, त्याने निवृत्तीचा सध्या विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. २००७ च्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा तो सदस्य होता. पण, त्याला एकदिवसीय विश्वचषक जिंकायचा आहे. ती मनिषा त्याने उघडपणे बोलून दाखवली आहे. आणि विश्वचषक जिंकण्याचा आणखी एकदा प्रयत्न करणार असल्याचं रोहीत म्हणाला आहे. (IPL 2024, CSK vs MI)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community