- ऋजुता लुकतुके
घरच्या मैदानावर आपणच शेर आहोत हे चेन्नई सुपर किंग्ज संघाने परत एकदा दाखवून दिलं. आणि या हंगामातील सलग दुसरा विजय मिळवताना त्यांनी गुजरात टायटन्स संघाचा ६३ धावांनी धुव्वा उडवला. चेन्नईचं सामन्यावर निर्विवाद वर्चस्व होतं. आधी गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने आधी फलंदाजीसाठी पाचारण केल्यावर चेन्नईचे दोन्ही सलामीवीर गुजरातच्या गोलंदाजांना भारी ठरले. ऋतुराज गायकवाड (४६) आणि रचिन रवींद्र (४६) यांनी ६२ धावांची सलामी चेन्नईला करून दिली. (IPL 2024 CSK vs GT)
आणि अजिंक्य रहाणे १२ धावांवर बाद झाला असला, तरी शिवम दुबेनं ५ षटकारांची आतषबाजी करत २३ चेंडूंत ५१ धावा केल्या. आणि चेन्नईला ६ बाद २०६ अशी धावसंख्या गाठून दिली. (IPL 2024 CSK vs GT)
2⃣ in 2⃣ for Chennai Super Kings 👏👏
That’s some start to #TATAIPL 2024 for the men in yellow 💛
Scorecard ▶️ https://t.co/9KKISx5poZ#TATAIPL | #CSKvGT | @ChennaiIPL pic.twitter.com/njrS8SkqcM
— IndianPremierLeague (@IPL) March 26, 2024
(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीने जेव्हा घरच्यांना मैदानातून व्हीडिओ कॉल केला)
संघाला दोनशेच्या पलीकडे नेण्यात याचा मोठा वाटा
त्यानंतर गुजरात टायटन्सची फलंदाजी सुरू झाल्यावर वृद्धिमान साहा (२१) आणि साई सुदर्शन (३७) यांनी गुजरातसाठी आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला खरा. पण, हे दोघं बाद झाल्यावर डेव्हिड मिलरचा (२१) अपवाद वगळता इतर फलंदाज झटपट बाद झाले. आणि गुजरातचा अख्खा संघ २० षटकांत ८ बाद १४३ धावाच करू शकला. (IPL 2024 CSK vs GT)
दीपक चहर, मुस्तफिझुर रेहमान आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. चेन्नई सुपर किंग्ज संघ आता दोन सामन्यात दोन विजय मिळवून गुणतालिकेत निर्विवाद पहिल्या स्थानावर आहे. तर परपल कॅपच्या शर्यतीत मुस्तफिझूर रेहमान ६ बळींसह अव्वल आहे. (IPL 2024 CSK vs GT)
चेन्नई संघाने सलग दुसऱ्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीला फलंदाजीसाठी पाठवलं नाही. पहिल्या सामन्यात बंगळुरू विरुद्ध महेंद्रसिंग धोनीला फलंदाजीला येण्याची गरज भासली नव्हती. तर गुजरात विरुद्ध सहावा गडी बाद झाल्यानंतरही संघ प्रशासनाने धोनी ऐवजी समीर रिझवीला पाठवलं. रिझवीने आल्या आल्या दोन षटकार मारत संघाला दोनशेच्या पलीकडे नेण्यात मोठा वाटा उचलला. (IPL 2024 CSK vs GT)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community