IPL 2024, CSK vs SRH : चेन्नईच्या विजयात धोनीचा हा अनोखा विक्रम साकार

IPL 2024, CSK vs SRH : रविवारी चेन्नई सुपर किंग्जने हैद्राबादचा पराभव केला तेव्हा धोनीचाही एक मोलाचा विक्रम साकार होत होता 

204
Archery World Cup : तिरंदाजीच्या विश्वचषकात भारताला ऐतिहासिक सुवर्ण 
Archery World Cup : तिरंदाजीच्या विश्वचषकात भारताला ऐतिहासिक सुवर्ण 
  • ऋजुता लुकतुके

रविवारी चेन्नईच्या पी चिदंबरम मैदानात (P Chidambaram Maidana) चेन्नई सुपरकिंग्जनी सनरायझर्स हैद्राबादचा (IPL 2024, CSK vs SRH) ७८ धावांनी पराभव केला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेतही तिसरं स्थान पटकावलं. आणि त्याचबरोबर धोनीचाही (M.S Dhoni) एक अनोखा आयपीएल विक्रम साकार झाला. या लीगमध्ये १५० विजय मिळवणारा धोनी हा पहिला खेळाडू ठरला आहे. धोनी एकूण २५९ आयपीएल सामने खेळला आहे. यात त्याने हा मोठा मापदंड सर केला आहे. धोनीच्या नावावर ५,१७८ धावा जमा आहेत. त्याचा स्ट्राईक रेट आहे १३४ धावांचा. (IPL 2024, CSK vs SRH)

(हेही वाचा- Railway Traffic Disrupted: लोकलच्या डब्याचे चाक रुळावरून घसरल्याने सीएसएमटी ते पनवेल वाहतूक विस्कळीत)

या हंगामातही धोनी आपल्या बॅटने कमाल करतो आहे. तळाला येऊन घणाघाती फलंदाजी करताना ९ सामन्यांत तो एकदाही बाद झालेला नाही. २५९ धावांच्या स्ट्राईकरेटसह त्याने ९६ धावा केल्या आहेत. (IPL 2024, CSK vs SRH)

रविवारी सनरायझर्स हैद्राबाद विरुद्धही धोनी (M.S Dhoni) चार चेंडू शिल्लक असताना फलंदाजीला उतरला. पण, त्याने नटराजनचा पहिलाच चेंडू चौकारासाठी टोलवला. दुसऱ्या चेंडूंवर त्याने एकेरी धाव घेत तो ५ धावांवर नाबाद राहिला. आयपीएलमध्ये धोनीला अढळ स्थान आहे. कणखर नेतृत्व, कठीण परिस्थितीतही शांत राहण्याची वृत्ती आणि तळाला येऊन घणाघाती फलंदाजी करण्याचं कौशल्य यासाठी तो ओळखला जातो. (IPL 2024, CSK vs SRH)

(हेही वाचा- IPL 2024, Virat Kohli : विराट कोहलीची वॉर्नर आणि शिखर धवनच्या विक्रमांशी बरोबरी )

आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून धोनी (M.S Dhoni) चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतोय. पाचदा त्याने संघाला ही लीग जिंकून दिली आहे. तर भारतीय राष्ट्रीय संघासाठीही धोनीने टी-२० विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तीनही आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत. (IPL 2024, CSK vs SRH)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.