- ऋजुता लुकतुके
दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध गुजरात टायटन्स (GT) हा या आयपीएलमधील ३२ वा सामना होता. पहिल्यांदाच एखादा संघ या हंगामात शंभरच्या आत सर्वबाद झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) मुकेश कुमार, ईशांत शर्मा आणि ट्रिस्टन स्टब्ज यांच्या तेज माऱ्यासमोर गुजरातचे फलंदाज चकले. शुभमन गिल (१२) आणि राहुल टेवाटिया (१०) यांच्या खेरीज इतर एकही गुजरातचा फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकला नाही. राशिद खानने (Rashid Khan) तळाला येऊन ३१ धावा केल्या म्हणून गुजरातने निदान ८० धावांचा टप्पा ओलांडला. मुकेश कुमारने (Mukesh Kumar) १४ धावा देत ३ बळी मिळवले. तर ईशांत शर्माने २ षटकांत ८ धावा देत २ बळी मिळवले. (IPL 2024, DC vs GT )
(हेही वाचा- PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे रालोआ उमेदवारांना पत्र; म्हणाले…)
नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी संथ होती. चेंडू ना उसळी घेत होते, ना छान बॅटवर येत होते. त्यामुळेच ८९ धावांचं आव्हान सर करायला दिल्ली संघालाही ४ गडी गमावावे लागले. (IPL 2024, DC vs GT )
Ensuring a quick finish, ft Rishabh Pant & Sumit Kumar 🙌
A comprehensive all-round performance from Delhi Capitals helps them register their 3️⃣rd win of the season 😎
Recap the match on @StarSportsIndia and @JioCinema 💻📱#TATAIPL | #GTvDC pic.twitter.com/c2pyHArwE7
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2024
गुजरात संघाची चांगल्या सुरुवातीनंतर लय बिघडली असून आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यांपैकी ३ त्यांनी जिंकलेत. तर ४ गमावलेत. त्यामुळे गुणतालिकेत त्यांची सातव्या स्थानावर धसरण झाली आहे. तर दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाला आता हळू हळू विजयाची लय सापडतेय. सलग दोन विजयांनंतर त्यांनी गुणतालिकेत सहाव्या स्थानावर मजल मारली आहे. गुजरात विरुद्ध दिल्लीची गोलंदाजी चांगली झाली. एकतर गुजरातच्या फलंदाजांना धावा जमवता येत नव्हत्या. आणि त्या दडपणाखाली सातत्याने फलंदाज बाद होत गेले. (IPL 2024, DC vs GT )
(हेही वाचा- Coco Islands Row : नेहरूंनी म्यानमारला दिलेले ‘कोको’ बेट वापरत आहे चीन; अंदमानचे भाजप उमेदवार विष्णुपद रे यांचा दावा)
उलट ८९ धावांचं आव्हान असताना दिल्लीचे फलंदाज मनमोकळे खेळत होते. त्यामुळे पृथ्वी शॉ (७) झटपट बाद झाला असला तरी जेक फ्रेझर – मॅकगर्क (२०), अभिषेर पोरेल (१५), शाय होप (१७) आणि कर्णधार रिषभ पंत नाबाद १६ धावा करत दिल्लीला विजयी केलं. त्यांनी ८९ धावा नवव्या षटकातच पूर्ण केल्या. ४ बाद ६७ अशी अवस्था असताना केलेली जबाबदार फलंदाजी आणि यष्टीरक्षणात २ झेल आणि २ यष्टीचीत अशी कामगिरी करणाऱ्या रिषभ पंतला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. (IPL 2024, DC vs GT )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community