- ऋजुता लुकतुके
क्रिकेटमध्ये धावा अडवणं म्हणजे तितक्याच धावा करण्यासारखं आहे, असं नेहमीच म्हटलं जातं. सामना फक्त फलंदाज किंवा गोलंदाज जिंकून देत नसतात, तर क्षेत्ररक्षकांची त्यांना साथ लागते. या उक्ती दिल्ली विरुद्ध गुजरात सामन्यात शब्दश: खऱ्या ठरल्या. दिल्लीच्या २२४ धावांचा पाठलाग करताना गुजरात संध निर्धारित २० षटकांत २२० धावा करू शकला. संघाला कमी पडलेल्या ५ धावा १९ व्या षटकांत ट्रिस्टन स्टब्जने सीमारेषेवर षटकार अडवून रोखल्या होत्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. (IPL 2024 DC vs GT)
स्टब्जच्या क्षेत्ररक्षणामुळे रशिद खानला तो षटकार मिळाला नाही आणि फक्त एका धावेवर समाधान मानावं लागलं. रसिख सलामचा हा चेंडू रशिद खानने लाँग-ऑफला टोलवला आणि चेंडू सीमापारच होणार होता. पण, स्टब्जने तो सूर मारून अडवला. त्यानंतर त्याचा तोल जाऊन तो सीमारेषेबाहेर पडला. पण, लगेच स्वत:ला सावरत त्याने चेंडू परत गोलंदाजाकडे परतवलाही. पण, या सगळ्या प्रयत्नांत त्याने ५ धावा वाचवल्या. तो हमखास जाणारा षटकार होता. (IPL 2024 DC vs GT)
This blinder from Tristan Stubbs saved 5 runs for Delhi Capitals🔥
They won the match in 4 runs!
Stubbs hero for capitals..
David Miller & Rashid khan, you can love to watch them any day❤️
Rishabh Pant#GTvsDC #IPL2024 pic.twitter.com/UwJKCIS0Wn— Rakesh_sundarRay (@RSundarRay) April 24, 2024
(हेही वाचा – Mumbai Crime : हरवलेल्या दोन भांवडाचे मृतदेह एका बंद मोटारीत आढळून आल्याने खळबळ उडाली)
गुजरात टायटन्ससाठी ‘या’ दोघांनी केली कामगिरी
या सामन्यांत दोन्ही संघांनी शेवटच्या १० षटकांत हाणामारी केली. दिल्लीसाठी कर्णधार रिषभ पंतने ४३ चेंडूंत ८८ तर अक्षर पटेलने ६६ धावा करत संघाला दोनशेचा टप्पा ओलांडून दिला. यात रिषभच्या फटकेबाजीमुळे दिल्लीने ९८ धावा शेवटच्या ५ षटकांत केल्या. पुढे जाऊन तीच कामगिरी डेव्हिड मिलर आणि रशिद खान यांनी गुजरात टायटन्ससाठी केली. मिलरने २३ चेंडूंत ५५ धावा करताना ३ षटकार आणि ७ चौकार ठोकले. तर रशिद खानने ११ चेंडूंत २१ धावा केल्या. साई किशोरनेही मोक्याच्या क्षणी दोन षटकार मारले. या तिघांमुळे गुजरात संघाने शेवटच्या ७ षटकांत ९८ धावा केल्या. आणि सुरुवातीला अशक्य वाटणारं आव्हान साध्य होईल अशी आशा निर्माण झाली. (IPL 2024 DC vs GT)
शेवटच्या षटकात गुजरातला विजयासाठी १८ धावा हव्या होत्या. मुकेश कुमारच्या पहिल्या दोन चेंडूंवर रशिदने चौकार ठोकले. त्यानंतर पाचव्या चेंडूवरही षटकार ठोकत त्याने प्रयत्न सुरूच ठेवलेल होते. पण, मध्ये दोन चेंडूंवर पडलेल्या यॉर्करमुळे संघाला अखेर ४ धावा कमीच पडल्या. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. (IPL 2024 DC vs GT)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community