- ऋजुता लुकतुके
दिल्ली कॅपिटल्स संधाने लखनौ सुपरजायंट्स संघाचा १९ धावांनी (IPL 2024, DC vs LSG) पराभव करून स्पर्धेत धुसर का होईना पण, बाद फेरीची आशा जिवंत ठेवली आहे. तर मंगळवारच्या पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्सलाही धुगधुगी असली तरी समोरचं आव्हान खूपच कठीण झालं आहे. लखनौसाठी दिल्लीचा पाचव्या क्रमांकाचा फलंदाज ट्रिस्टियन स्टब्जने पाठलागाचं गणितच बिघडवलं. ३ बाद १११ अशी धावसंख्या असताना तो फलंदाजीला आला. आणि त्यानंतर ४ षटकार आणि ३ षटकारांची आतषबाजी करत त्याने २५ चेंडूंत ५७ धावा केल्या. आणि त्याचबरोबर ४७ धावांची मोलाची भागिदारीही केली. त्यानंतर त्याने अक्षरबरोबर आणखी ५० धावा जोडल्या आणि दिल्लीला ४ बाद २०८ अशी धावसंख्या गाठून दिली. (IPL 2024, DC vs LSG)
(हेही वाचा- धक-धक गर्ल Madhuri Dixit झाली ५७ वर्षांची! जाणून घेऊया तिचा जीवन प्रवास)
सुरुवातीला अभिषेक पोरेलनेही (Abhishek Porel) ३३ चेंडूंत ५५ धावा केल्या होत्या. तर शाय होपने ३३ धावांचं योगदान दिलं होतं. थोडक्यात, दिल्लीच्या फंलदाजांनी जबाबदारीने फलंदाजी केली. लखनौसमोर २०९ धावांचं आव्हान ठेवलं. लखनौची सुरुवात मात्र अडखळती झाली. पहिल्या षटकापासून त्यांचे बळी जात राहिले. (IPL 2024, DC vs LSG)
For his eye-catching bowling spell, Ishant Sharma bags the Player of the Match award 🏆
Scorecard ▶️ https://t.co/qMrFfL9gTv#TATAIPL | #DCvLSG pic.twitter.com/sx8iAhH01U
— IndianPremierLeague (@IPL) May 14, 2024
ईशांत शर्माने (Ishant Sharma) पहिल्याच षटकात चेंडूची गती बेमालूम बदलून आधी के एल राहुलला (KL Rahul) मामा बनवलं. त्यानंतर क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आणि दीपक हुडालाही (Deepak Hooda) त्याने बाद केलं. ईशांतने ३४ धावांत ३ बळी मिळवले. अक्षर पटेलनेही आपल्या पहिल्याच षटकांत मार्कस स्टॉईनिसला बाद केल्यावर लखनौची अवस्था ४ बाद ४४ झाली होती. पण, निकोलस पुरनचे इरादे वेगळे होते. त्याने अजिबात न डगमगता फटकेबाजी सुरूच ठेवली. आणि २७ चेंडूंत ६१ धावा केल्या. त्यानंतर तळाच्या अर्शद खाननेही ३३ चेंडूंत ५८ धावा करत लखनौच्या विजयासाठी निकराचे प्रयत्न केले. (IPL 2024, DC vs LSG)
(हेही वाचा- Natural Calamities : नैसर्गिक आपत्तींमुळे देशात 5 लाखांहून अधिक लोक विस्थापित)
पण, दोघांनाही दुसऱ्या बाजूने फलंदाजांची मदत मिळाली नाही. आणि लखनौचा संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद १८९ धावा करू शकला. लखनौच्या पराभवामुळे राजस्थान रॉयल्स संघाचा बाद फेरीतील प्रवेश नक्की झाला आहे. तर दिल्लीचा संघ १४ सामन्यांतून १४ गुणांवर पोहोचला असला. तरी चेन्नई आणि हैद्राबादपेक्षा संघ मागेच आहे. आणि बंगळुरू विरुद्ध चेन्नई सामन्याचा निकाल दिल्लीचा बाद फेरीतील प्रवेश ठरवेल. तर लखनौचा अजून एक सामना बाकी असला तरी त्यांच्या बाद फेरीची शक्यता धुसरच आहे. (IPL 2024, DC vs LSG)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community