- ऋजुता लुकतुके
२० षटकांत २२३ धावांचं आव्हान हे शक्य असलं तरी कठीणच आणि दिल्ली विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या फळीसाठीही ते आव्हानात्मकच होतं. पण, राजस्थानची फलंदाजी सखोल आहे. त्यामुळे संजू सॅमसन सोळाव्या षटकात बाद झाल्यावरही आणि संघाची अवस्था ४ बाद १६४ असताना रोव्हमन पॉवेल, शुभम दुबे आणि दोनोवन परेरा यांच्यावर संघाची भिस्त होती. राजस्थानला शेवटच्या तीन षटकांत विजयासाठी ४२ धावा हव्या असताना कर्णधार रिषभ पंतने चेंडू कुलदीप यादवच्या हातात सोपवला आणि कुलदीपने आपल्या लेगस्पिनची जादू दाखवली. (IPL 2024 DC vs RR)
पहिल्याच चेंडूवर त्याने परेराला पायचीत पकडलं. पंचांनी परेराला बाद दिलं नव्हतं. पण, कुलदीपने कर्णधार रिषभ पंतचं मन वळवलं आणि तिसऱ्या पंचांकडे दाद मागत हा बळी मिळवला. रवी अश्विनही फटकेबाजीच्या मूडमध्ये होता. पण, षटकातील शेवटच्या चेंडूवर कुलदीपने त्यालाही झेलबाद केलं. यष्टीच्या बाहेर असलेला हा चेंडू अश्विनने जराही टायमिंग न साधता टोलवला होता. कुलदीपने या षटकांत ४ धावा देत २ बळी मिळवले आणि तिथेच राजस्थानच्या आक्रमणातील हवा गेली. दिल्लीचा विजय तिथेच पक्का झाला. (IPL 2024 DC vs RR)
Just conceded 4 runs and picked up 2 wickets in an all important 18th over.
Kuldeep Yadav what a champion bowler ❤#DCvsRR pic.twitter.com/WR44QVBWGC
— PREMRAJ MEENA (@premrajmeena71) May 7, 2024
(हेही वाचा – T20 World Cup 2024 : ब्रायन लाराच्या मते तिसऱ्या क्रमांकावर विराटला नाही, तर सूर्यकुमारला खेळवावं)
दिल्ली संघाच्या बाद फेरीच्या आशा कायम
कुलदीपने ४ षटकांत २५ धावा देताना २ बळी मिळवले. त्याच्या या कामगिरीसाठी त्यालाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला. ‘माझी गोलंदाजीतील ताकद आणि अनुभव मी वापरला. परेराला मी दक्षिण आफ्रिके पाहिलं होतं. तो बॅकफूटवर खेळणारा खेळाडू आहे. त्यामुळे मी तो क्रीझवरच राहील अशी काळजी घेतली. अंतिम षटकांमध्ये गोलंदाजी करताना चेंडूचा टप्पा खूप महत्त्वाचा ठरतो. तेच मी केलं. चेंडू जरासा फूल लेंग्थ राहील असं बघितलं. आणि दिशाही अचूक ठेवली,’ असं कुलदीप सामन्यानंतर बोलताना म्हणाला. (IPL 2024 DC vs RR)
राजस्थानवर मिळवलेल्या विजयानंतर आता दिल्ली संघाचे १२ सामन्यांतून १२ गुण झाले आहेत आणि बाद फेरीच्या त्यांच्या आशा कायम आहेत. (IPL 2024 DC vs RR)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community