IPL 2024, Dinesh Karthik : दिनेश कार्तिकला हवी टी-२० विश्वचषक संघात जागा 

IPL 2024, Dinesh Karthik : यंदाच्या आयपीएलमध्ये २९ वर्षीय दिनेश कार्तिक तळाला येऊन घणाघाती फलंदाजी करतोय

172
Dinesh Karthik : दिनेश कार्तिक रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नवीन फलंदाजीचा प्रशिक्षक आणि सल्लागार
  • ऋजुता लुकतुके

कर्नाटकचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) ३९ वर्षांचा आहे. हे वय खरंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचं. पण, दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आपल्या लढाऊ बाण्याने अगदी टी-२० विश्वचषकासाठीच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतोय. अगदी शेवटच्या दोन सामन्यांतही त्याने ५३ चेंडूंत ८५ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईकरेट आहे दोनशेच्या वर. आयपीएलमधील कामगिरीनंतर दिनेश कार्तिकला आता भारतीय संघाची स्वप्नही पडू लागली आहेत. (IPL 2024, Dinesh Karthik)

(हेही वाचा- Eknath Shinde: महायुतीमध्ये शिवसेना किती जागांवर लढणार? अखेर मुख्यमंत्र्यांनी आकडा सांगितला)

‘आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर भारतीय राष्ट्रीय संघात खेळणं ही मानाचीच गोष्ट असेल,’ असं दिनेश कोलकातामध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाला. हा आपला शेवटचा आयपीएल हंगाम असेल हे दिनेशने जवळ जवळ स्पष्ट केलं आहे. पण, त्याचवेळी जून २०२४ मध्येच अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धा पार पडणार आहे. भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाजाच्या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे. दिनेश कार्तिक या स्पर्धेत नक्कीच आहे. (IPL 2024, Dinesh Karthik)

२०२२ चा टी-२० विश्वचषक दिनेश (IPL 2024, Dinesh Karthik) खेळला आहे. भारतीय संघाविषयी बोलताना तो म्हणतो, ‘भारतीय संघाविषयीचे निर्णय घेण्यासाठी ३ सक्षम डोकी सध्या काम करतायत. रोहित (Rohit), अजित (Ajith) आणि राहुल (Rahul) यांच्याविषयी मला आदरच आहे. आणि ते जे ठरवतील ते संघासाठी चांगलंच असेल,’ असंही दिनेशने म्हटलं आहे.  (IPL 2024, Dinesh Karthik)

(हेही वाचा- IPL 2024, Virat Kohli : विराट कोहलीचा आयपीएलमध्ये असाही विक्रम)

संजू सॅमसन (Sanju Samson), जितेश शर्मा (Jitesh Sharma), ध्रुव जुरेल (Dhruv Jurel), रिषभ पंत (Rishabh Pant) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) असे पाच यष्टीरक्षक फलंदाज भारतीय संघासाठीच्या स्पर्धेत आहेत. आणि यातील दोघांना संघात संधी मिळू शकते. दिनेश कार्तिकने यंदाच्या आयपीएलमध्ये ८ सामन्यांत २५१ धावा केल्या आहेत त्या १९६ धावांच्या स्ट्राईकरेटने. (IPL 2024, Dinesh Karthik)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.