IPL 2024, Eliminator : दहशतवाद्यांच्या अटकेमुळे एलिमिनेटर सामन्यासाठी अहमदाबादमधील सुरक्षा व्यवस्था वाढवली 

IPL 2024, Eliminator : बुधवारी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दरम्यान एलिमिनेटरचा सामना होणार आहे

182
IPL 2024, Eliminator : दहशतवाद्यांच्या अटकेमुळे एलिमिनेटर सामन्यासाठी अहमदाबादमधील सुरक्षा व्यवस्था वाढवली 
IPL 2024, Eliminator : दहशतवाद्यांच्या अटकेमुळे एलिमिनेटर सामन्यासाठी अहमदाबादमधील सुरक्षा व्यवस्था वाढवली 
  • ऋजुता लुकतुके

अहमदाबाद शहरात विमानतळावर इस्लामिक स्टेट्स या दहशतवादी संघटनेच्या कथित ४ सदस्यांना अटक झाली आहे. या घटनेनंतर शहरातील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) आयपीएल एलिमिनेटर साठीचा पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मंगळवारी इथं कोलकाता आणि हैद्राबाद संघांदरम्यान पहिला क्वालिफायर सामनाही पार पडला. तर बुधवारी राजस्थान (Rajasthan) आणि बंगळुरू (Bangalore) दरम्यान एलिमिनेटर सामना इथं रंगणार आहे. (IPL 2024, Eliminator)

(हेही वाचा- IPL 2024, Gautam Gambhir : ‘तो सगळ्यात चांगला संघमालक आहे,’ असं गौतम गंभीर कुणाबद्दल म्हणाला?)

या सामन्यासाठी स्टेडिअमवरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. गुजरात पोलिसांनीच दिलेल्या माहितीनुसार, ३,००० च्या वर सुरक्षा रक्षक सामन्यासाठी तैनात करण्यात येणार आहेत. ५ पोलीस उपायुक्त आणि १० सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या देखरेखीखाली बंदोबस्त ठेवण्यात येईल. तर ८०० खाजगी सुरक्षा रक्षकांची मदतही गरज पडल्या, घेण्यात येणार आहे. (IPL 2024, Eliminator)

पोलिसांचं एक गस्त पथकही परिस्थितीवर लक्ष टेवण्यासाठी तयार ठेवण्यात येणार आहे. २० मे ला अहमदाबाद विमानतळावर इस्लामिक स्टेट्स या दहशतवादी संघटनेचे ४ संशयित दहशतवादी पोलिसांनी पकडले आहेत. हे चारही श्रीलंकन नागरिक असून चेन्नई मार्गे ते भारतात आल्याचं समजतंय. आयपीएल दरम्यान शहरात दहशतवादी कारवाई करण्याचा त्यांचा बेत होता.  (IPL 2024, Eliminator)

(हेही वाचा- “मातोश्रीचे लाचार श्री होणाऱ्यांना…” Shishir Shinde गजानन कीर्तिकरांवर का कडाडले?)

या चारजणांच्या अटकेनंतर आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यासाठीही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. (IPL 2024, Eliminator)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.