- ऋजुता लुकतुके
आयपीएलचा (IPL) १७ वा हंगाम २२ मार्चपासून सुरु झालं आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये १७ सामने झाले आहेत. तर शनिवारी १७ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमने सामने येत आहेत. इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचं उत्पन्न आणि प्रेक्षकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. आयपीएलच्या पहिल्या १७ मॅचमध्ये अनेक विक्रम तुटले आहेत. आता आयपीएलच्या दर्शकांच्या संख्येचा विक्रम देखील तुटला आहे.डिस्ने स्टारवर यंदा पहिल्या सामन्यांमध्ये ३५ कोटी यूजर्सनी आयपीएलचे सामने ऑनलाईन पाहिले. गेल्या वर्षीच्या आकडेवारीच्या तुलनेत दर्शकांची संख्या २० टक्क्यांनी वाढली आहे. (IPL 2024)
आयपीएलच्या (IPL) प्रेक्षक संख्येसंदर्भात ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलद्वारे जारी केलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या पहिल्या १० सामन्यांचा वॉच टाईम ८०२८ कोटी मिनिटं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के अधिक आहे. रिलायन्स कंपनीच्या जिओ सिनेमा ॲपवर आयपीएल २०२४ चं प्रसारण ८ विविध भाषांमध्ये केलं जात आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी देखील कंपनीकडून विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. (IPL 2024)
(हेही वाचा – CBI : दिल्लीत नवजात बालकांच्या तस्करीप्रकरणी सीबीआयची छापेमारी, ८ बालकांची सुटका)
हा होता सर्वाधिक पाहिला गेलेला सामना
आयपीएलची (IPL) सुरुवात २२ मार्चला झाली होती. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पहिली मॅच झाली होती. त्यावेळी १६.८ कोटी लोकांनी हा सामना लाईव्ह पाहिला होता. सीएसके आणि आरसीबीतील मॅच आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक पाहिला गेलेला सामना ठरला होता. टेलिव्हिजन प्रसारणाचे हक्क असलेल्या स्टार कंपनीचे हेड संजोग गुप्ता यांनी यासंदर्भात बोलताना म्हटलं की, आम्ही टाटा आयपीएल २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या संख्येचा विक्रम बघून आनंदित आहोत. डिस्ने स्टारनं यापूर्वीचा सिझन जिथं संपला तिथून नवी सुरुवात केल्याचं म्हटलं. (IPL 2024)
आयपीएलचं स्टार स्पोर्टस आणि जिओ सिनेमावरुन प्रक्षेपण केलं जातं आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये प्रेक्षक संख्या वाढलेली आहे. आयपीएलला (IPL) वाढत जाणारा प्रतिसाद हा भारतीयांचं क्रिकेटप्रती असलेलं प्रेम दर्शवते. शनिवारी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमने सामने येणार आहेत. बंगळुरूने ३ पैकी २ सामने गमावेल आहेत. आणि एकमेव विजय मिळवला आहे. तर राजस्थान रॉयल्सचा संघ सलग तीन विजय मिळवून पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे बंगळुरू संघाला गुण तालिकेत वर येण्यासाठी हा सामना जिंकणं आवश्यक आहे. (IPL 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community