IPL 2024 : ‘आयपीएल भारतीय संघासाठी शॉर्टकट नको,’ असं गौतम गंभीर का म्हणतो?

IPL 2024 : भारतीय संघासाठी निवड होताना आयपीएल हा निकष नको असं गौतम गंभीरने म्हटलं आहे. 

116
Gautam Gambhir : भारतीय क्रिकेटमधील ‘मि. इन्टेन्स’ समोरची नवीन आव्हानं, भारतीय क्रिकेटचा स्थित्यंतराचा काळ
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघातील माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मेंटॉर किंवा मार्गदर्शक आहे आणि या हंगामात संगाने केलेल्या कामगिरीचं बरंचसं श्रेयही त्याला दिलं जात आहे. आयपीएल स्पर्धेविषयी त्याला आदर आहे. पण, ही स्पर्धा भारतीय राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचा निकष असू नये, असंही गंभीरला वाटतं. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट यांची योग्य सांगड घालणं खेळाडूंना जमलं पाहिजे, असं त्याचं मत आहे. (IPL 2024)

अलीकडेच गंभीरने रवीचंद्रन अश्विनच्या युट्यूब चॅनलवर एक मुलाखत दिली आणि यात आयपीएलविषयी आपलं मत परखडपणे मांडलं. आयपीएलमुळे खेळाडूंना अनुभव आणि संधी मिळत असली तरी पारंपरिक क्रिकेटला त्यामुळे छेद दिला जाऊ नये, असं गंभीरला वाटतं. (IPL 2024)

(हेही वाचा – मतदानाची टक्केवारी घटली! CM Eknath Shinde यांनी घेतली गंभीर दखल)

गंभीरने केली ही भीती व्यक्त 

‘मला आयपीएल बघून एकच काळजी वाटते, ती म्हणजे, यातील किती जणांना कसोटी क्रिकेट खेळायची इच्छा आहे? आयपीएल हा तरुणांसाठी भारतीय संघासाठी प्रवेशद्वार ठरू नये. नाहीतर क्रिकेटवरच त्याचा परिणाम होईल,’ अशी भीती त्याने व्यक्त केली. पण, त्याचवेळी त्याने आयपीएलमधील क्रिकेटच्या दर्जाचंही कौतुक केलं. ‘आयपीएलमधील क्रिकेट आंतरराष्ट्रीय स्तरावरही अत्युच्च दर्जाचं आहे. आंतरराष्ट्रीय संघांची आयपीएल संघांशी तुलना केली तर आयपीएल संघ वरचढ ठरतील. भारतातही देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्यांना आयपीएलचा फायदा झालाय. त्यांचा स्तर उंचावलाय,’ असं गंभीर आवर्जून म्हणाला. (IPL 2024)

गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारताच्या २०११ च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू होता. अंतिम फेरीतही त्याने अर्धशतक ठोकलं होतं. तर कोलकाता संघाला २०१२ आणि २०१६ साली त्याच्याच नेतृत्वाखाली आयपीएल विजेतेपद मिळालं. आता या हंगामापासून तो कोलकाता संघाचा मार्गदर्शक आहे.  गौतम गंभीर हा बोलण्यात काहीसा फटकळ आणि फलंदाज म्हणून आक्रमक मानला जातो. त्यावरही गौतम मोकळेपणाने बोलला. ‘लोत मला हसताना बघायला येत नाहीत. मला जिंकताना बघायला येतात. मलाही जिंकायला आवडतं. आताही कोलकाताची ड्रेसिंग रुम विजेत्यांची असावी हा एकच विचार माझ्या डोक्यात आहे. बाकी सगळं माझ्या स्वभावाचा भाग आहे,’ असं गौतम म्हणाला. (IPL 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.