- ऋजुता लुकतुके
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आयपीएलच्या चालू हंगामातून अनिश्चित काळासाठी माघार घेतली आहे. म्हणजे तो पुन्हा कधी खेळेल आणि खेळेल का हे स्पष्ट नाही. संघाच्या सनरायझर्स हैद्राबाद (SRH) विरुद्धच्या सामन्यातही तो खेळला नव्हता. पण, या सामन्यानंतर त्याने ही बातमी जाहीर केली. या हंगामात मॅक्सवेलचा फॉर्म हरवलाय. त्याला भोपळा फोडतानाही त्रास होतोय. अशावेळी हैद्राबादच्या सामन्यापूर्वी आपणच कर्णधार दू प्लेसिसला विल जॅक्सला संधी द्यायला सांगितलं होतं, असं मॅक्सवेल म्हणाला आहे. (IPL 2024, Glenn Maxwell)
(हेही वाचा- Sangli Lok Sabha : राज्यातील काँग्रेसचा बंडखोर उमेदवाराला पाठिंबा?)
पत्रकार परिषदेत बोलताना मॅक्सवेल (Glenn Maxwell) म्हणाला, ‘मी सध्या शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या पुरेसा तंदुरुस्त नाही. माझी ही अवस्था मी बंगळुरूचा कर्णधार आणि संघ प्रशासन यांना सांगितली. आणि त्यानंतरच मी माघारीचा निर्णय घेतला आहे.’ पण, नेमका किती काळ तो आयपीएलपासून दूर असेल हे त्याने सांगितलं नाही. (IPL 2024, Glenn Maxwell)
‘आधीच्या सामन्यानंतर मीच कर्णधार फाफ आणि प्रशिक्षकांना नवीन खेळाडूला संधी देण्याविषयी सूचवलं होतं. मला सध्या विश्रांती हवी आहे. पुढे गरज पडली तर मी संघात परतेन. आणि तेव्हा मी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या जास्त सक्षम असेन,’ असं मॅक्सवेल म्हणाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने सुरुवातीच्या पॉवरप्लेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण, त्यानंतर कॅमेरुन ग्रीन (Cameron Greene) किंवा ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) धावसंख्या पुढे घेऊन जाऊ शकलेले नाहीत. (IPL 2024, Glenn Maxwell)
(हेही वाचा- IPL 2024, SRH VS RCB : ट्रेव्हिस हेडचं ३९ चेंडूंत घणाघाती शतक )
खरंतर शेवटच्या षटकांत हाणामारी ही मॅक्सवेलची खासियत आहे. पण, या हंगामात तो ही कामगिरी पार पाडू शकलेला नाही. आतापर्यंतच्या ६ सामन्यांत मॅक्सवेलच्या धावा आहेत ३२. यापैकी २८ धावा त्याने एकट्या कोलकाता विरुद्ध केलेल्या आहेत. उर्वरित ५ सामन्यातील त्याच्या धावा आहेत ०,३, ० , १ आणि ०. त्यामुळेच मॅक्सवेलने माघारीचा निर्णय घेतलेला दिसतोय. पण, क्रिकेटमधून मानसिक थकव्याच्या कारणाने विश्रांती घेण्याची ही मॅक्सवेलची पहिलीच खेप नाही. (IPL 2024, Glenn Maxwell)
(हेही वाचा- Ram Mandir Ayoddhya : रामनवमीनिमित्त अयोध्येत उत्साह; रामलल्लाचे दर्शन २० तास चालू रहाणार)
अगदी राष्ट्रीय संघ ऑस्ट्रेलियासाठी खेळतानाही मॅक्सवेलने यापूर्वी दौरे याच कारणाने अर्धवट सोडले आहेत. त्यानंतरच मॅक्सवेलने कसोटी सोडून टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला होता. टी-२० मध्ये मात्र ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाची मोठी ताकद आहे. यंदा मात्र आयपीएलमध्ये तो फॉर्ममध्ये नसल्यामुळे त्याच्यावर टीकाही झाली होती. सुनील गावसकर यांनीही विराटला मॅक्सवेलची साथ मिळत नसल्याचं वक्तव्य केलं होतं. (IPL 2024, Glenn Maxwell)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community