-
ऋजुता लुकतुके
आयपीएलमध्ये (IPL 2024) बुधवारी झालेला गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्सचा सामना अनेक अर्थांनी वेगळा आणि रोमहर्षक होता. सामना शेवटपर्यंत रंगला. शेवटच्या चेंडूवर त्याचा निकाल लागला. गुजरातने अनपेक्षित विजय मिळवला. आणि या सामन्यात गुजरातचा कर्णधार शुभमन गिलला (Shubman Gill) लोकांनी मैदानात चिडलेलं पाहिलं. इतकंच नाही तर पंचांच्या दिशेनं हातवारे करतानाही तो दिसला. केंद्रस्थानी होता एक वाईड चेंडू. आणि तो वाईड आहे की नाही यावर शुभमन आणि पंचांमध्ये काहीसा वाद झाला.
१७व्या षटकांत मोहीत शर्माचा एक चेंडू ऑफ-स्टंपच्या बराच बाहेरून गेला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन तो खेळूही शकला नाही. सॅमसनने बॅट मात्र जोरदार घुमवली होती. मैदानावरील पंचांनी चेंडू वाईड दिला. पण, हा निर्णय न रुचल्यामुळे गुजरात संघाने तिसऱ्या पंचांची मदत घेतली.
(हेही वाचा – Arvind Kejriwal : आम आदमी पक्षात दलितांशी भेदभाव; Rajkumar Anand यांचा केजरीवालांवर घणाघात)
आधी पंचांनी हा चेंडू वाईड नसल्याचा निर्वाळा दिला. आणि अचानक निर्णयासाठी थोडा जास्तीचा वेळ घेऊन त्यांनी आपलाच निर्णय पुन्हा फिरवला. आणि चेंडू वाईड ठरवला. निर्णयातील ही फेरफार गुजरातचा कर्णधार शुभमन गिलला (Shubman Gill) रुचली नाही. (IPL 2024)
— Sitaraman (@Sitaraman112971) April 10, 2024
शुभमनची मैदानातील पंचांबरोबर बादावादी झाली. या सामन्यात पहिली फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सनी ३ बाद १९६ अशी धावसंख्या उभारली. यात संजू सॅमसनचा वाटा ६८ तर रियान परागचा वाटा ७६ धावांचा होता. राजस्थानच्या फलंदाजांचा हा धडाका पाहूनही शुभमन थोडा वैतागलेला होता. पण, गुजरात संघाने हे आव्हान शेवटच्या षटकांत पार केलं. आणि राजस्थानवर ३ गडी राखून विजय मिळवला. (IPL 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community