IPL 2024 Hardik Pandya : हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी

IPL 2024 Hardik Pandya : मुंबई इंडियन्सने षटकांचा वेग न राखल्यामुळे कर्णधार म्हणून हार्दिकला त्याचा फटका बसणार आहे. 

179
Hardik Pandya : हार्दिक पांड्या खेळणार सय्यद अली टी-२० स्पर्धा
  • ऋजुता लुकतुके

मुंबई इंडियन्सचा यंदाच्या आयपीएलमध्ये दहावा पराभव लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध झाला. लखनौ सुपर जाएंट्सनं पहिल्यांदा फलंदाजी करताना ६ विकेटवर २१४ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सनं ६ विकेटवर १९६ धावांपर्यंत मजल मारली. या मॅचदरम्यान स्लो ओव्हर रेट प्रकरणी बीसीसीआयनं (BCCI) हार्दिक पांड्या आणि मुंबईच्या इतर खेळाडूंवर कारवाई केली आहे. हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. मुंबईकडून तिसऱ्यांदा अशा प्रकारची चूक झाल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. (IPL 2024 Hardik Pandya)

मुंबईकडून तिसऱ्यांदा चूक झाल्यानं बीसीसीआयनं कठोर कारवाई केली आहे. हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. आयपीएलच्या १८ व्या हंगामात एका मॅचला हार्दिक पांड्याला मुकावं लागणार आहे. हार्दिक पांड्याला बीसीसीआयनं (BCCI)  ३० लाख रुपयांचा दंड केला आहे. हार्दिक पांड्या पुढच्या हंगामात दुसऱ्या संघाकडून खेळला तरी त्याच्यावर ही बंदी कायम राहणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा मुंबई इंडियन्सला स्लो ओव्हर रेट प्रकरणी कारवाईला सामोरं जावं लागलं आहे. (IPL 2024 Hardik Pandya)

(हेही वाचा – PM Narendra Modi यांना हरवण्यासाठी मुस्लिम वाढवत आहेत उबाठा शिवसेनेची ताकद, परिधान केल्या भगव्या टोप्या)

हार्दिक पांड्याला ३० लाख रुपयांचा दंड

बीसीआयनं हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय संघातील खेळाडूंना ज्यमध्ये इम्पॅक्ट प्लेअरचा देखील समावेश असेल त्यांनी १२ लाख रुपये किंवा सामन्याच्या मानधनातील ५० टक्के रक्कम जी कमी असेल ती भरावी लागणार आहे. मुंबई इंडियन्सला यापूर्वी देखील स्लो ओव्हर रेट प्रकरणी कारवाईला सामोरं जावं लागलं होतं. दुसऱ्या वेळी हार्दिक पांड्याला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई इंडियन्सला लखनौ सुपर जाएंटस विरुद्ध १८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या मॅचसह मुंबईचा यंदाच्या आयपीएलमधील प्रवास संपला आहे. मुंबईने १४ पैकी ४ मॅचमध्ये विजय मिळवला तर त्यांना १० सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. (IPL 2024 Hardik Pandya)

दरम्यान, आयपीएलच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी यावर्षी विविध संघांवर कारवाई करण्यात आलेली आहे. दिल्ली कॅपिटल्सनं देखील स्लो ओव्हर रेट प्रकरणी कारवाईचा सामना केला आहे. दिल्लीचा कॅप्टन रिषभ पंतवर देखील एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. आता हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) देखील एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. दहाव्या पराभवानंतर आयपीएलकडून एका सामन्याची बंदी घालण्यात आल्यानं दुसरा धक्का बसला आहे. (IPL 2024 Hardik Pandya)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.