- ऋजुता लुकतुके
भारताचा अव्वल अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) आपला सरावाचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यातून त्याने तंदुरुस्तीसाठीच्या व्यायामाबरोबरच फलंदाजी आणि गोलंदाजीचाही कसून सराव सुरू केल्याचं दिसतंय. व्हिडिओचा मथळा त्याने दिलाय, ‘मी परतलोय!’ (IPL 2024)
या व्हिडिओत पांड्या (Hardik Pandya) त्याचे ठेवणीतील मोठे फटके खेळताना दिसत आहे. एकदिवसीय विश्वचषकादरम्यान हार्दिकचा पायाचा घोटा दुखावला होता. आणि त्यानंतर तीन महिने तो क्रिकेटपासून दूर आहे. मधल्या सर्व आंतरराष्ट्रीय मालिकांना तो मुकला आहे. त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने टी-२० संघाचं यशस्वी नेतृत्व केलं आहे. (IPL 2024)
आता आयपीएल ही हार्दिकची पहिली परीक्षा असणार आहे. टी-२० विश्वचषकात तो रोहित शर्माचा सहाय्यक असेल म्हणजे उपकर्णधार असेल, असं बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्याचा संघातील समावेश नक्की आहे. आता आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून त्याला आपली जागा भक्कम करायची आहे. सरावाची ही एकमेव संधी त्याच्याकडे आहे. (IPL 2024)
View this post on Instagram
(हेही वाचा – Eknath Shinde : सुडाचे राजकारण करणारा नेता असतो का? असा सवाल करत शिंदेंनी ठाकरेंवर साधला निशाणा)
आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्सकडे स्वेच्छेनं परतला आहे. आणि मुंबई फ्रँचाईजीचं तो नेतृत्वही करणार आहे. २०२२ मध्ये गुजरात टायटन्सचं नेतृत्व करताना त्याने संघाला आयपीएल करंडक जिंकून दिला होता. टी-२० विश्वचषकात तो उपकर्णधार असला तरी पुढील दिवसांमध्ये तोच भारतीय टी-२० संघाचं नेतृत्व करेल, असं बीसीसीआयचे सचिव शाह यांनी राजकोटमध्ये स्पष्ट केलं आहे. (IPL 2024)
सध्या हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गुजरातमध्ये बडोद्यात रिलायन्सच्या क्रिकेट मैदानात सराव करत आहे. आयपीएल हंगामात तो स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतणार आहे. (IPL 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community