IPL 2024, Hardik Pandya : सलग दोन पराभवांनंतर हार्दिक पांड्या २ दिवस कुठे होता?

बाकीचा मुंबई संघ दिल्लीत असताना हार्दिक अचानक संघाला सोडून गेला होता

323
IPL 2024 MI Lose : मुंबई इंडियन्सच्या पाचव्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या काय म्हणतो?
  • ऋजुता लुकतुके

हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) यंदाचं आयपीएल (IPL 2024) चांगलं गेलेलं नाही. एकीकडे क्रिकेट फॅन्सकडून होणारी टीका आणि दुसरीकडे मुंबई इंडियन्सचे दोन जिव्हारी लागणारे पराभव या स्थितीचा सामना हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) केला आहे. या दरम्यान हार्दिक पांड्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. हार्दिक पांड्यानं हैदराबाद विरुद्धच्या मॅचनंतर ब्रेक घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईची पुढील मॅच १ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे. या दरम्यानच्या काळात हार्दिक पांड्या त्याच्या घरी पोहोचला असून त्यानं काही वेळ कुटुंबीयांसोबत घालवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मुंबईचा कर्णधार झाला तेव्हापासून त्याला टीकेचा सामना करावा लागत आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी हार्दिककडे नेतृत्त्व देण्यात आलं होतं. रोहित शर्माचे (Rohit Sharma) चाहते हार्दिक पांड्यावर टीका करताना दिसून आले आहेत. याशिवाय गुजरात टायटन्सच्या समर्थक प्रेक्षकांनी देखील अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) विरोधात नारेबाजी केली होती. या दरम्यानच्या काळात हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) त्यांच्या कुटुंबीयासोबत वेळ घालवण्यासाठी ब्रेक घेतल्याची माहिती आहे.

(हेही वाचा – Indian Football News : इगोर स्यायमॅकच फुटबॉल संघाचे प्रशिक्षक राहणार?)

मुंबई इंडियन्सची यापूर्वीची मॅच २७ मार्चला सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध झाली होती. त्या मॅचमध्ये मुंबईला 31 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता मुंबई इंडियन्सचे पुढील चार सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. सोमवारी 1 एप्रिलला मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स अशी मॅच होणार आहे. पाचवेळा आयपीएलमध्ये (IPL 2024) विजेतेपद पटकावणारी मुंबई यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या विजयासाठी संघर्ष करत आहे. राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या विरुद्ध मुंबई इंडियन्स भिडणार आहे. हे सर्व सामने मुंबईत होणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.