IPL 2024, Hybrid Cricket Pitch : धरमशाळातील मैदानातील हाय-ब्रीड खेळपट्टी वापरासाठी खुली

देशातील ही पहिली हाय - ब्रीड खेळपट्टी आहे

228
IPL 2024, Hybrid Cricket Pitch : धरमशाळातील मैदानातील हाय-ब्रीड खेळपट्टी वापरासाठी खुली
IPL 2024, Hybrid Cricket Pitch : धरमशाळातील मैदानातील हाय-ब्रीड खेळपट्टी वापरासाठी खुली
  • ऋजुता लुकतुके

देशातील पहिल्या हाय – ब्रीड क्रिकेट खेळपट्टीचं (Hybrid Cricket Pitch) अनावरण सोमवारी संध्याकाळी एका मोठ्या समारंभात करण्यात आलं. हिमाचल प्रदेशच्या धरमशाला मैदानात ही हाय – ब्रीड खेळपट्टी बनवण्यात आली आहे. आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ या सोहळ्याला हजर होते. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू पॉल टेलरही आवर्जून खेळपट्टी पाहण्यासाठी आला होता.

‘हाय – ब्रीड खेळपट्टीमुळे (Hybrid Cricket Pitch) देशातील क्रिकेटचा चेहरा मोहराच बदलून जाईल. आणि क्रिकेटमध्ये क्रांती घडून येईल. लॉर्ड्स आणि ओव्हल मैदानांवर हाय – ब्रीड खेळपट्टीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. आणि त्यानंतर धरमशाळा इथं आम्ही हा प्रयोग करायचा ठरवला. टेलर यांनी इंग्लंडहून येऊन त्यासाठी आम्हाला सहकार्य केलं. आता खेळपट्टीत आमूलाग्र बदल होतील,’ असं धुमाळ यांनी यावेळी बोलून दाखवलं. (IPL 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी घेतली राज ठाकरेंची भेट)

हाय ब्रीड खेळपट्टी म्हणजे काय?

नैसर्गिक गवत आणि फायबरचं कृत्रिम गवत यांची बनलेली खेळपट्टी म्हणजे हाय – ब्रीड खेळपट्टी. (Hybrid Cricket Pitch) सध्या ९५ टक्के नैसर्गिक गवत आणि ५ टक्के फायबर्स वापरून ही खेळपट्टी बनवली जाते. हाय – ब्रीड खेळपट्टी गवत दीर्घ काळ धरून ठेवते. त्यामुळे खासकरून कसोटीत चौथ्या आणि पाचव्या दिवशीही खेळपट्टीचा दर्जा घसरत नाही. शिवाय या खेळपट्टीची देखभाल करणंही सोपं आहे. त्यामुळे ग्राऊंडस्टाफचं कामही कमी होतं. स्पर्धेत फलंदाज आणि गोलंदाजांसाठी अशा खेळपट्टीवर समसमान संधी असते. (IPL 2024)

पॉल टेलर संचालक असलेल्या सिसएअर कंपनीने ही खेळपट्टी बनवली आहे. आयसीसीने अलीकडेच टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये हाय – ब्रीड खेळपट्टी (Hybrid Cricket Pitch) वापरायला परवानगी दिली आहे. तर चार दिवसांच्या कसोटींसाठी इंग्लिश काऊंटी हंगामात या खेळपट्टीची आधी चाचणी घेतली जाणार आहे. आणि त्यानंतर कसोटीत तिच्या वापरावर निर्णय होऊ शकेल. (IPL 2024)

(हेही वाचा – World Athletics Day : का साजरा केला जातो जागतिक ॲथलेटिक्स दिन आणि काय आहे या दिवसाचे महत्व?)

पॉल टेलर मात्र या खेळपट्टीच्या वापराबद्दल आत्मविश्वासाने बोलतात. ‘क्रिकेटवर या खेळपट्टीचा नक्कीच चांगला परिणाम होणार आहे. आणि खेळाचा दर्जा यामुळे वाढेल. पुढे मुंबई आणि अहमदाबादमध्ये हाय – ब्रीड खेळपट्टीचा (Hybrid Cricket Pitch) प्रयोग आम्ही करणार आहोत,’ असं टेलर यांनी बोलून दाखवलं. हाय – ब्रीड खेळपट्टीमुळे खेळाडूंच्या दुखापतीही कमी होतील, असा दावाही त्यांनी केला आहे. (IPL 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.