- ऋजुता लुकतुके
टी-२० क्रिकेटचा खेळ फटक्यांच्या आतषबाजीसाठीच ओळखला जातो. दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) युवा ऑस्ट्रेलियन फलंदाज जेक फ्रेझर – मॅकगर्कने (IPL 2024, Jake Fraser – McGurk) सामन्याच्या चौथ्याच षटकात अरुण जेटली स्टेडिअम दणाणून सोडलं. राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) तेज गोलंदाज आवेश खानच्या एका षटकात त्याने २८ धावा वसूल केल्या. मॅकगर्कने उत्तुंग फटके मारत या षटकात ४, ४, ४, ६, ४, ६ असे ४ चौकार आणि दोन षटकार लगावले. अभिषेक पोरेल बरोबर सलामीला आलेल्या मॅकगर्कने सुरुवातीपासूनच फलंदाजीचा पाचवा गिअर टाकला होता. दोघांनी २६ चेंडूंत ६० धावांची सलामी दिल्लीला करून दिली. या ६० धावांपैकी ५० धावा एकट्या मॅकगर्कच्या होत्या. पण, चौथं षटक समसनाटी ठरलं. (IPL 2024, Jake Fraser – McGurk)
(हेही वाचा- Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याचे एसटी बँकेवरील संचालक पद रद्द, कारण काय?)
यात त्याने चौकारांची हॅट-ट्रीक सुरुवातीला पूर्ण केली. त्यानंतर एक षटकार मग चौकार आणि पुन्हा षटकार वसूल केला. आवेश खानला कुठे चेंडू टाकावा हेच कळत नव्हतं. तो गोंधळलेला दिसत होता. (IPL 2024, Jake Fraser – McGurk)
JFM show in Delhi! 🔥
He departs not before another breathtaking FIFTY off just 19 balls 👏👏
Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia 💻📱#TATAIPL | #DCvRR pic.twitter.com/T9XzoNLYxq
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2024
मॅकगर्कने (IPL 2024, Jake Fraser – McGurk) शेवटे मारलेले दोन षटकार तर खडे खडे म्हणजे जागचं न हलता मारलेले होते. २० चेंडूंत त्याने ५० धावा केल्या त्या ३ षटकार आणि ७ चौकांच्या मदतीने. चौथ्या षटकातच त्याने दिल्लीचं अर्धशतक फलकावर लावलं. त्यानंतर मात्र अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) फिरकीने त्याला चकवलं. फ्रेझर-मॅकगर्कने या हंगामात आपल्या घणाघाती फलंदाजीने वेगळी ओळख तयार केली आहे. काही चेंडूंतच सामन्याची दिशा तो पलटवू शकतो. गोलंदाजांवर संपूर्ण वर्चस्व गाजवू शकतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठीही आगामी काळात तो तगडा पर्याय असणार आहे. आयपीएलच्या एकाच हंगामात २० किंवा त्याहून कमी चेंडूंत तीन अर्धशतकं झळकावणारा तो पहिला फलंदाज आहे. (IPL 2024, Jake Fraser – McGurk)
(हेही वाचा- Bombay High Court: औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतर विरोधाच्या याचिकेबाबत काय म्हणाले मुंबई उच्च न्यायालय? जाणून घ्या)
मंगळवारी त्याच्या कामगिरीमुळेच दिल्लीने राजस्थान (Rajasthan Royals) विरुद्ध दोनशे धावांचा पल्ला गाठला. अभिषेक पोरेल या दुसऱ्या सलामीवीराने ३६ चेंडूंत ६५ धावा केल्या. (IPL 2024, Jake Fraser – McGurk)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community