-
ऋजुता लुकतुके
दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स ही एरवी फलंदाजीच्या दोन पॉवरहाऊसची लढत असं म्हटलं गेलं असतं. पण, यावेळी वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा आणि हर्षित राणा या तिघा भारतीय गोलंदाजांनी दिल्लीला रोखलं. त्यांचा मॅक गुकर्क हा तडाखेबाज फलंदाज १२ धावांवर बाद झाला. शाय होप (६), रिषभ पंत (२७) आणि ट्रिस्टन स्टब्ज (४) झटपट बाद झाल्यामुळे दिल्लीची अवस्था ८ बाद १११ झाली होती. पण, संघाचा डाव सावरला तो कुलदीप यादवने. २६ चेंडूंत ३५ धावा करताना त्याने १ षटकार आणि ५ चौकार लगावले. या कामगिरीमुळेच दिल्लीचा संघ दीडशेचा टप्पा गाठू शकला. बाकी दिल्लीच्या फलंदाजीला वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) १३ धावांत ३ बळी मिळवत सुरुंग लावला. (IPL 2024)
(हेही वाचा – Shrinivas Khale : सर्वांचे लाडके खळे काका अर्थात संगीतसृष्टीतील महान संगीतकार !)
Varun Chakaravarthy’s sparkling spell helps him bag the Player of the Match Award ✨🏆
Scorecard ▶️ https://t.co/eTZRkma6UM#TATAIPL | #KKRvDC | @KKRiders pic.twitter.com/h9wd8qO589
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2024
दिल्लीच्या फलंदाजीचं रहस्य मनमोकळ्या फटकेबाजीत आहे. पण नेमकं तेच वरुण, हर्षित आणि वैभव यांनी त्यांना करू दिलं नाही. त्यामुळे फटकेबाजीच्या नादात विकेट मात्र जात राहिल्या. पण, ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर चेंडूही थांबून येत होता. त्यामुळे कोलकातालाही फलंदाजी तितकी सोपी गेली नाही. पण, दवाचा फायदा मिळाला. त्यातच फिल सॉल्टने आधीच्या सामन्यापासून पुढे सुरू केल्यासारखी फटकेबाजी सुरू ठेवली. ३२ चेंडूंत त्याने ६८ धावा केल्या. आणि त्यामुळे कोलकातावर दडपण असं कधी आलंच नाही. सुनील नरेन (१५), रिंकू सिंग (११) झटपट बाद झाले. पण, त्यानंतर श्रेयस अय्यर (३५) आणि वेंकटेश अय्यर (२५) यांनी धावांचा वेग कमी न होऊ देता फलंदाजी केली. आणि कोलकाताला विजय मिळवून दिला. (IPL 2024)
कोलकाताचा ९ सामन्यातून हा सहावा विजय होता. त्यामुळे १२ गुणांसह आता कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या स्थानावर भक्कम आहेत. तर दिल्लीचा संघ ५ विजय आणि ६ पराभवांसह आता सहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. (IPL 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community