- ऋजुता लुकतुके
कोलकाता नाईट रायडर्स संघ (IPL 2024, KKR Superman) सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. याचं बरंचसं श्रेय संघाचा अष्टपैलू खेळाडू सुनील नरेनला (Sunil Narine) जातं. या हंगामात त्याने आतापर्यंत ११ सामन्यांत एक शतक आणि दोन अर्धशतकं केली आहेत. अकरा बळीही मिळवले आहेत. फक्त याच हंगामात नाही तर मागची दहा वर्षं तो कोलकाता संघाची इमाने इतबारे सेवा करत आहे. त्याच्या याच योगदानाचा गौरव करताना संघाचा मालक शाहरुख खानने (Shah Rukh Khan) सुनील नरेनला ‘सुपरमॅन’ म्हटलं आहे. (IPL 2024, KKR Superman)
(हेही वाचा- मुंबईकरांसाठी अपडेट ; लोकलच्या मध्य व हार्बर मार्गावर रविवारी ‘Megablock’ )
नरेनचा (Sunil Narine) फॉर्म असाच राहिला तर कोलकाता संघाला १० वर्षं हुलकावणी देत असलेलं विजेतेपद ते मिळवू शकतात याची शाहरुख खानला (Shah Rukh Khan) कल्पना आहे. (IPL 2024, KKR Superman)
EXCLUSIVE CHAT with SRK: If home is where the heart is, we’re sure that King Khan’s heart is 💜!
Get ready to watch the Star of Eden on Star Sports today!
Don’t miss Part 1 of Knight Club presents – King Khan’s Rules only on Star Sports – TODAY, 6.15 PM! pic.twitter.com/xEXZjngNZc
— Star Sports (@StarSportsIndia) May 3, 2024
म्हणूनच स्टार स्पोर्ट्स वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख म्हणतो, ‘आमच्या घरी आम्ही त्याला सुपरमॅन म्हणतो. देवाचा अंश असलेला. मैदानावर तो राजा आहे. गोलंदाज, फलंदाज, यष्टीरक्षक, क्षेत्ररक्षक अशा सगळ्या भूमिका तो निभावू शकतो. तो संपूर्ण खेळाडू आहे.’ २५ वर्षीय नरेनने कोलकात्याच्या दोन विजेतेपदांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली आङे. २०१२ आणि २०१४ मध्ये कोलकाताने आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. (IPL 2024, KKR Superman)
(हेही वाचा- IPL 2024, KKR vs MI : कोलकाता संघाचा वानखेडे मैदानावरील विजयांचा दुष्काळ संपला )
२०१२ मध्ये नरेनने २१ आणि २०१४ मध्ये २४ बळी मिळवले होते. या दोन्ही हंगामात परदेशी गोलंदाजाने मिळवलेले हे सर्वाधिक बळी होते. २०१४ मध्ये त्याने गोल्डन जर्सीसह पर्पल कॅपही मिळवली होती. (IPL 2024, KKR Superman)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community