- ऋजुता लुकतुके
सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती या फिरकी दुकलीने नेटाने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता संघाने घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा १८ धावांनी पराभव केला. आणि या विजयासह बाद फेरीत आपलं स्थान पक्कं केलं. घरच्या मैदानात केलेल्या या कामगिरीमुळे कोलकाता संघ अर्थातच आनंदी होता. आणि त्यांनी मैदानाला एक फेरी मारत पाठिराख्यांबरोबर हा विजय साजरा केला. २०२१ नंतर पहिल्यांदाच कोलकाता संघाने बाद फेरी गाठली आहे. त्यामुळे खेळाडूंमध्ये तो उत्साहही होता. (IPL 2024 KKR Victory Lap)
संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर खेळाडूंबरोबर सगळ्यात पुढे होता. त्याने चाहत्यांना चेंडूवर स्वाक्षऱ्या करून दिल्या. खेळाडूंनी टेनिस बॉलवर गौतम गंभीरची स्वाक्षरी घेतली होती. आणि हे चेंडू टेनिसच्या रॅकेटने खेळाडू प्रेक्षकांत भिरकावत होते. संघाचा या हंगामातली ईडन गार्डन्सवरील शेवटचा सामना होता. त्यामुळे ही चाहत्यांमध्ये मिसळण्याची ही संधी संघाने साधली. (IPL 2024 KKR Victory Lap)
whole KKR squad did the victory lap around Eden Gardens, thanking the fans. @KKRiders 💜 pic.twitter.com/z73IrzUWkZ
— sohom (@AwaaraHoon) May 11, 2024
(हेही वाचा – Article 370 : आजोबांचे स्वप्न साकार! नातू विचारतो, काय साध्य केलं?)
या हंगामात कोलकाता नाईट रायडर्ससाठी वेंकटेश अय्यर, सुनील नरेन, फिल सॉल्ट यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. तर गोलंदाजीत मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांनी संघाला बळी मिळवून दिले आहेत. सांघिक कामगिरीच्या जोरावर कोलकाता हा बाद फेरी गाठणारा पहिला संघ ठरला आहे. (IPL 2024 KKR Victory Lap)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community