IPL 2024, K L Rahul : के एल राहुल बंगळुरू विरुद्ध खेळणार का यावर अजूनही प्रश्नचिन्ह

IPL 2024, K L Rahul : राहुलने सोमवारी संघाबरोबर जोरदार सराव मात्र केला 

134
IPL 2024 K L Rahul : के एल राहुलने लखनौ सुपर जायंट्सच्या कट्टर चाहत्याचं असं केलं स्वागत
  • ऋजुता लुकतुके

लखनौ सुपरजायंट्स संघाचा (LSG) पुढील सामना मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाशी होणार आहे. या सामन्यापूर्वी लखनौ संघाचा कर्णधार के एल राहुलने संघाबरोबर जोरदार सराव केला. फलंदाजी आणि इतर व्यायाम प्रकारातही तो सामील झाला होता. पण, तो सामना खेळण्या इतका तंदुरुस्त आहे का आणि मंगळवारी तो खेळणार का, यावर लखनौ संघ प्रशासनाने अजून कुठलंही उत्तर दिलेलं नाही. उलट पूर्णपणे मौन बाळगलं आहे. (IPL 2024, K L Rahul)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: मुंबईच्या उत्तर-पश्चिम मतदारसंघातून शरद पोंक्षे यांच्या नावाची चर्चा)

या आधीच्या पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्धच्या सामन्यात संघाने २१ धावांनी विजय मिळवला. आणि सामन्यात राहुल इम्पॅक्ट खेळाडू म्हणून खेळला. पण, सामन्यात संघाचं नेतृत्व केलं ते निकोलस पुरनने (Nicholas Puran). ‘नेट्समध्ये तो किती मोकळेपणाने खेळू शकतो, हे पाहून त्याच्या खेळण्यावर निर्णय घेतला जाईल,’ असं निकोलस पुरन आधीच्या सामन्यापूर्वी म्हणाला होता. (IPL 2024, K L Rahul)

त्यानंतर राहुलने त्या सामन्यात ९ चेंडूंत १५ धावा केल्या. त्यानंतर अर्शदीप सिंगने त्याला बाद केलं. संघ प्रशासनाने राहुलला विश्रांती देऊन त्याच्याजागी नवीन उल हकला बदली खेळाडू म्हणून खेळवलं. आताही सरावादरम्यान राहुलने फलंदाजी आणि इतर सराव केला असला तरी तो यष्टीरक्षणाचा व्यायाम करताना दिसला नाही. म्हणजेच बंगळुरू विरुद्ध क्विंटन डी कॉकच ती भूमिका निभावेल हे जवळ जवळ निश्चित आहे. (IPL 2024, K L Rahul)

(हेही वाचा- Swatantra Veer Savarkar : दिल्लीकरांसाठी ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाच्या खास शोचं आयोजन, अभिनेते रणदीप हुड्डा यांची विशेष उपस्थिती)

लखनौ (LSG) संघासाठी यंदाच्या हंगामात निकोलस पुरन हा आतापर्यंतचा सर्वोत्तम फलंदाज ठरला आहे. त्याने ३ सामन्यांत एका अर्धशतकासह १०३ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेटही १७१ इतका तगडा आहे. के एल राहुल बद्दल बोलायचं झालं तर इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत शेवटच्या चार कसोटींत राहुल कमरेच्या दुखण्यामुळे खेळू शकला नव्हता. त्यानंतर त्याने लंडनमध्येही उपचार घेतले. आणि आता तो आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहे. कारण, या स्पर्धेनंतर काही दिवसांतच टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. आणि राहुलला अर्थातच भारतीय संघात स्थान मिळवण्याची इच्छा आहे. पण, सध्या तो तंदुरुस्तीशी झगडतानाच दिसतोय. (IPL 2024, K L Rahul)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.