IPL 2024, K L Rahul : के एल राहुल शेवटच्या दोन सामन्यांपूर्वी लखनौ संघाची कप्तानी सोडेल का?

IPL 2024, K L Rahul : राहुल आणि लखनौ संघाचे मालक संजीव गोयंका यांच्याबरोबरच्या जाहीर विसंवादानंतर चर्चांना उधाण आलं आहे 

181
IPL 2024, K L Rahul : के एल राहुल शेवटच्या दोन सामन्यांपूर्वी लखनौ संघाची कप्तानी सोडेल का?
IPL 2024, K L Rahul : के एल राहुल शेवटच्या दोन सामन्यांपूर्वी लखनौ संघाची कप्तानी सोडेल का?
  • ऋजुता लुकतुके

लखनौ सुपर जायंट्स संघाचं या आयपीएलमधील आव्हान संपल्यात (IPL 2024, K L Rahul) जमा आहे. पण, संघाच्या उर्वरित दोन सामन्यांपूर्वी भलत्याच चर्चा आणि अफवांना उधाण आलं आहे. सनरायझर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) संघाने बुधवारी लखनौचा १० षटकांच्या आत आणि १० गडी राखून पराभव केला. या सामन्यादरम्यान संघाचे एक मालक संजीव गोयंका (Sanjeev Goenka) यांनी मैदानातच कर्णधार के एल राहुलकडे नाराजी व्यक्त केल्याचं साफ दिसलं. मोठा पराभव आणि संघ मालकांची नाराजी या पार्श्वभूमीवर के एल राहुल स्वत:हून संघाची कप्तानी सोडेल अशी चर्चा आता रंगली आहे.  (IPL 2024, K L Rahul)

(हेही वाचा- Kantilal Bhuria: “ज्यांच्या दोन बायका असतील त्यांना…” कांतीलाल भूरिया यांच्या वक्तव्याने मोठा वाद)

लखनौच्या पुढील सामन्याला अजून पाच दिवस बाकी आहेत. आणि या सुटीच्या दिवसांत राहुल कप्तानीविषयी असा निर्णय घेऊ शकतो. कारण, लखनौ संघाने २०२२ च्या लिलावादरम्यान राहुलला १७ कोटी रुपये देऊन विकत घेतलं होतं. पण, पुढील वर्षासाठी लखनौ फ्रँचाईजी त्याला संघात कायम ठेवेल याची चिन्ह कमीच आहेत. अशावेळी राहुल कप्तानीवर काहीतरी निर्णय घेईल अशी चिन्ह दिसत आहेत. (IPL 2024, K L Rahul)

‘पुढील सामन्याला अजून पाच दिवस बाकी आहेत. अशावेळी राहुल फक्त आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करेल. त्याच्या मनात असंच काहीतरी चाललं आहे,’ असं सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं आहे. (IPL 2024, K L Rahul)

(हेही वाचा- Akshaya Tritiya 2024: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीयेला कोणत्या १० वस्तूंची खरेदी कराल?)

सनरायझर्स हैद्राबादने (Sunrisers Hyderabad) बुधवारी लखनौचा मोठ्या फरकाने पराभव केला. विजयासाठी १६५ धावांचं लक्ष्य ट्रेव्हिस हेड (Travis Head) आणि अभिषेक शर्मा या हैद्राबादच्या सलामीवीरांनी ९.४ षटकांत आणि १० गडी राखून पूर्ण केलं. या सामन्यानंतर राहुल आणि संघ मालक संजीव गोयंका (Sanjeev Goenka) यांच्यात वादावादी झाल्याचं मैदानात स्पष्ट दिसलं. (IPL 2024, K L Rahul)

यानंतर राहुलच्या कप्तानीविषयी चर्चा सुरू झाली आहे. इतकंच नाही तर लखनौ संघाची फलंदाजी सुरू असताना राहुलने पॉवरप्लेमध्ये ३२ चेंडूंत २७ धावा केल्या. फक्त दोन क्षेत्ररक्षक ३० यार्डांच्या पलीकडे असताना राहुलच्या धिम्या फलंदाजीवरही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे लखनौ संघात सगळं काही आलबेल नाही. टीकेचा रोख कर्णधार राहुलवर आहे, हे नक्की आहे.  (IPL 2024, K L Rahul)

(हेही वाचा- Israel-Hamas conflict: हमासच्या विरोधात इस्रायल एकटा उभा राहील, अमेरिकेच्या इशाऱ्याला पंतप्रधान नेतन्याहू यांनी काय दिले उत्तर?)

लखनौ संघ अजून स्पर्धेतून पूर्ण बाद झालेला नाही. पुढील दोन सामने जिंकून त्यांचे १६ गुण होऊ शकतात. पण, त्यांची धावगती उणे ७१५ आहे. ती सुधारणंही आवश्यक आहे.  (IPL 2024, K L Rahul)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.