ऋजुता लुकतुके
आयपीएलच्या नवीन हंगामासाठी लखनौ सुपरजायंट्स फ्रँचाईजीन (Lucknow Supergiants) दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू (IPL 2024) लान्स क्लूसनरची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. ‘लखनौ सुपरजायंट्स (Lucknow Supergiants) संघाने आधीच मजबूत असलेल्या प्रशिक्षकांच्या फळीत लान्स क्लूसनर यांना सामील केलं आहे,’ असं लखनौ संघाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे. (IPL 2024)
(हेही वाचा- Lok Sabha 2024 : भाजपाच्या १९५ उमेदवारांची पहिली यादी निश्चित; पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढवणार)
लखनौ संघात सध्या जस्टिन लँगर हे मुख्य प्रशिक्षक आहेत. आणि टी श्रीराम हे सहाय्यक प्रशिक्षक (IPL 2024) आहेत. त्यांच्याबरोबर आता लान्स क्लूसनर काम करेल. क्लूसरन हा दक्षिण आफ्रिकेतील लीगमध्ये दरबन सुपरजायंट्स संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. ही फ्रँचाईजी लखनौ सुपरजायंट्सच्या (Lucknow Supergiants) मालकांचीच आहे. (IPL 2024)
या नियुक्तीमुळे लान्स क्लूसनर (Lance Klusener) पुन्हा एकदा आयपीएलमध्ये प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी तो मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सहाय्यक प्रशिक्षकही राहिला आहे. शॉन पोलॉकचा (Sean Pollock) सहाय्यक म्हणून त्याने काम केलं होतं. वेस्ट इंडिज लीगमध्येही क्लूसनर प्रभावी ठरला होता. त्याने गयाना वॉरियर्सला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. (IPL 2024)
(हेही वाचा- Lok Sabha 2024 : भाजपाच्या १९५ उमेदवारांची पहिली यादी निश्चित; पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढवणार)
लान्स क्लूसनरला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षणाचाही चांगला अनुभव आहे. तो यापूर्वी अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक होता. तर दक्षिण आफ्रिका आणि झिंबाब्वे संघाचाही तो फलंदाजी प्रशिक्षक होता. भारतात त्रिपुरा संघाबरोबरही त्याने काम केलं आहे. (IPL 2024)
दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना अष्टपैलू म्हणून एकदिवसीय क्रिकेटवर त्याने चांगला ठसा उमटवला होता. १९९९ च्या एकदिवसीय विश्वचषकात तो स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू होता. (IPL 2024)