IPL 2024, Longest Six : ३८ वर्षीय दिनेश कार्तिकचा स्पर्धेतील सगळ्यात लांब षटकार पाहिलात का?

दिनेश कार्तिकने ३८ चेंडूंत ८३ धावा करताना १०५ मीटरवर खेचलेला षटकार विक्रमी होता

222
IPL 2024, Longest Six : ३८ वर्षीय दिनेश कार्तिकचा स्पर्धेतील सगळ्यात लांब षटकार पाहिलात का?
IPL 2024, Longest Six : ३८ वर्षीय दिनेश कार्तिकचा स्पर्धेतील सगळ्यात लांब षटकार पाहिलात का?
  • ऋजुता लुकतुके

सनरायझर्य हैद्राबादने सोमवारी आयपीएलच्या (IPL 2024) इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या म्हणजेच तीन गडी गमावून २८७ धावा केल्या. आणि २८८ धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली, कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, तिघांची झुंज अपयशी ठरली. आरसीबीला २६२ धावांवर समाधान मानावं लागलं.

कोहली-डुप्लेसिस यांनी ३८ चेंडूत ८० धावांची तुफानी सलामी दिली. कोहली सातव्या षटकात बाद झाल्यानंतर डुप्लेसिसने शानदार अर्धशतक झळकावले. बंगळुरूचा अर्धा संघ १२२ धावांवर बाद झाला. कार्तिकने हैदराबादला सहजासहजी विजय मिळवू दिला नाही. त्याने चौफेर फटकेबाजी करीत हैदराबादवर दडपण आणले होते.

(हेही वाचा – IPL 2024, RCB Playoff Chances : बंगळुरूला सलग ६ पराभवांनंतरही बाद फेरीची संधी आहे का?)

जबरदस्त फॉर्मात असलेल्या दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) अवघ्या ३५ चेंडूत ८३ धावांची तुफानी खेळी केली. जरी तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही, तरीही त्याने स्फोटक फलंदाजी करून आरसीबीसाठी पराभवाचे अंतर कमी केले. तसेच कार्तिकने हंगामातील सर्वात लांब म्हणजे १०८ मीटरचा षटकार टोलावला. (Longest Six)

१५ षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या १८७/६ होती. संघाला विजयासाठी पाच षटकात १०१ धावांची गरज होती. १६व्या षटकाची जबाबदारी टी. नटराजन यांच्या खांद्यावर होती. दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) पॅड लाइनवर टाकलेला चेंडू मिड-विकेटच्या दिशेने हवेत मारला. बॅटला आदळल्यानंतर चेंडू थेट स्टेडियमच्या छताला लागला आणि खाली पडला. हा १०८ मीटरचा हा षटकार होता.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : ‘त्या’ पोस्ट हटवल्या; तरीही ‘एक्स’ला निवडणूक आयोगाचा आदेश अमान्य)

ट्रॅव्हिस हेडचे आक्रमक शतक आणि कर्णधार पॅट कमिन्सच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा २५ धावांनी पराभव केला. हेडच्या पहिल्या टी२० शतकाशिवाय, हेनरिक क्लासेनने धडाकेबाज ६७ धावा केल्या, ज्याच्या मदतीने सनरायझर्सने तीन गडी गमावून २८७ धावा केल्या आणि स्पर्धेच्या इतिहासात विक्रमी धावसंख्या नोंदवली. प्रत्युत्तरात आरसीबीचा संघ सात गड्यांच्या मोबदल्यात २६२ धावाच करू शकला. या आयपीएल (IPL 2024) सामन्यात ४० षटकात ५४९ धावा झाल्या जो एक विक्रम आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.