-
ऋजुता लुकतुके
लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स (LSG bt MI) यांच्यातील सामना लखनौने १८ धावांनी जिंकला. पण, सामना संपल्यानंतर दोन्ही ड्रेसिंग रुम तशा सुन्या सुन्याच होत्या. कारण, तब्बल १० पराभवांमुळे मुंबई इंडियन्स संघ पहिल्यांदाच तळाला राहिला. तर २१५ धावा करून आणि मुंबईचा पराभव करूनही लखनौला बाद फेरी गाठता आली नाही. ७ विजयांसह लखनौचे १४ गुण झाले आहेत. पण, सरस धावगतीच्या आधारे दिल्ली कॅपिटल्स त्यांच्या वर आहेत. आणि बाद चेन्नईचा पराभव झाला तरी संधी बंगळुरू किंवा दिल्लीलाच मिळेल. (IPL 2024)
शुक्रवारच्या सामन्यात निकोलस पुरनची (Nicholas Pooran) मात्र आणखी एक धुवाधार खेळी पाहायला मिळाली. के एल राहुलने (KL Rahul) डावाची सुरुवात चांगली केली होती. पण, लखनौच्या डावाला वेग मिळाला तो पुरन (Nicholas Pooran) पाचव्या क्रमांकावर फंलदाजीला आला तेव्हा. राहुल (KL Rahul) आणि पुरन यांनी चौथ्या गड्यासाठी १०९ धावांची भागिदारी रचली. यात निकोलस पुरनने (Nicholas Pooran) फक्त २९ चेंडूंत ७५ धावा केल्या. तर के एल राहुलने ४१ चेंडूंत ५५ धावा केल्या. या दोघांमुळे लखनौने २० षटकांत ६ बाद २१५ अशी धावसंख्या उभारली.
(हेही वाचा – South Mumbai LS Constituency : यामिनी ‘यशवंत’च! सावंतांची रोखणार विजयाची हॅटट्रीक?)
Match 67. Lucknow Super Giants Won by 18 Run(s) https://t.co/VuUaiv4G0l #TATAIPL #IPL2024 #MIvLSG
— IndianPremierLeague (@IPL) May 17, 2024
मुंबईसाठी नुवान थुसारा आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. मुंबईचा डाव सुरू झाला तेव्हा रोहित शर्माच्या (Rohit Sharma) साथीला डेवाल्ड ब्रेविस मैदानात उतरला. ही चाल यशस्वी ठरली. दोघांनी ८८ धावांची सलामी मुंबईला करून दिली. रोहितने तर वादळी फलंदाजी करताना ३८ चेंडूंत ६८ धावा केल्या. पण, दोघं एकामागून एक बाद झाले. आणि त्यानंतर सूर्यकुमार यादव शून्यावर बाद झाला तेव्हा मुंबईची गाडीच रुळावरून घसरली. कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर बिश्नोईने हा झेल पकडला. (IPL 2024)
त्यानंतर थेट सातव्या क्रमांकावरील नमन धीरने २८ चेंडूंत ६२ धावा करत मुंबईसाठी आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला. इशान किशन आणि हार्दिक पांड्या लवकर बाद झाले. त्यामुळे नमनला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. आणि अखेर मुंबईला १८ धावा कमी पडल्या. वर सांगितल्या प्रमाणे दोन्ही संघांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. आता बंगळुरू विरुद्ध चेन्नई सामन्यातून बाद फेरीचा चौथा संघ ठरेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community